Lockdown : लॉकडाऊन असूनही ‘कोरोना’ का पसरतोय?

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राने देशात लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, लॉकडाऊन असूनही कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Lockdown : लॉकडाऊन असूनही 'कोरोना' का पसरतोय?
Follow us
| Updated on: May 04, 2020 | 7:28 PM

मुंबई : देशात आजपासून (4 मे ते 17 मे) लॉकडाऊनचं (How Corona Spread In Lockdown) तिसरं पर्व सुरु झालं आहे. गेल्या 40 दिवसांपासून देशात लॉकडाऊन आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राने देशात लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, लॉकडाऊन असूनही कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात सध्या कोरोनाचे 42 हजार 533 रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा 13 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोना का पसरतोय याचा शोध (How Corona Spread In Lockdown) आता मुंबई मनपाने घेतला आहे.

लॉकडाऊन असूनही कोरोना का पसरतोय? याचा शोध घेण्यासाठी मुंबई मनपाने मलबार हिल येथील डी-विभागाचा शोध घेतला. आलिशान वस्ती पण तिथं मध्यमवर्गीय चाळी आणि गरिबांची झोपडपट्टीही आहे. त्यामुळे मुंबईची ही एक प्रतिकृतीच.

मलबार हिलचा समावेश असणाऱ्या मुंबईतील मनपा डी-विभागात मुंबई मनपाने तिथल्या कोरोनाबाधितांचे वर्गीकरण करुन अभ्यास केला. त्यातून वैद्यकीय कर्मचारी, कुटुंबीय, पोलीस कर्मचारी यांच्याबरोबरच परदेशी नागरिकांमुळे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि अनेक कुबेरांची निवासस्थानं असलेल्या या भागात कोरोनाची पावलं उमटल्याचं दिसत आहे.

सर्वात महत्वाचं एक कारण कळालं, ते म्हणजे घरी कंटाळा येतो, म्हणून शेजाऱ्यांकडे भेट देणारे कोरोना पसरवण्यास कारणीभूत ठरले आहेत (How Corona Spread In Lockdown).

एका जुन्या इमारतीत एक कोरोना बाधित सापडल्यावर मनपानं चौकशी केली, तेव्हा इमारतीत कडक निर्बंध असल्याचं दिसलं. फक्त एक कॅशियर असणारी व्यक्ती बाहेर जात असे. त्या व्यक्तीमुळे कोरोना संसर्ग आला असावा. त्यानंतर इतर रहिवाशी कसलीही काळजी न घेता एकमेकांकडे जात असल्यानं इतर 12 रहिवाशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला.

डी-विभागातील कोरोनाबाधितांचे वर्गीकरण

  • परदेशी नागरिक – 8
  • रुग्णालय कर्मचारी 0- 7
  • रुग्णालय कर्मचारी कुटुंबीय – 05
  • अत्यावश्यक सेवा कर्मचारी  – 19
  • पोलीस – 11
  • वरील बाधातांच्या संपर्कात आलेले – 163
  • चुकीने पॉझिटिव्ह दाखवलेले – 04

डी विभागातील कोरोनाबाधितांचे पूर्वविकार

  • मधुमेह – 44
  • हायपरटेन्शन – 28
  • दमा – 12
  • किडणी विकार – 12
  • कर्करोग – 05

मलबारहिलमधील सुपरस्प्रेडर

मलबार हिल असलेल्या डी विभागात एकामुळे अनेकांना कोरोना फैलाव होण्याचे प्रकारही घडलेत. तसं करणाऱ्या सुपर स्प्रेडरनाही मनपानं ओळखलंय.

1. वाहन चालक

2. हॉटेल कॅशियर

3. किराणा दुकानदार

4. रुग्णालयात दाखल रुग्ण

मलबारहिलची सध्याची स्थिती

  • उपचार सुरु – 242
  • कोरोनामुक्त – 055
  • मृत्यू – 022

मृतांचे वयोगट

60 ते 79 – 12

80पेक्षा जास्त – 03

40 ते 59 – 06

20 ते 39 – 01

How Corona Spread In Lockdown

संबंधित बातम्या :

पुणे जिल्ह्यात मद्य विक्री आणि उत्पादनाला परवानगी, कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम

बेळगावात ‘ग्राहक देवो भव:’, दारुच्या दुकानात हार घालून पहिल्या ग्राहकाचं स्वागत

पुण्यात पोलिसाचा पहिला कोरोनाबळी, 50 वर्षीय पोलिसाचा मृत्यू

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.