अमित शाहांना जरुर विचारणार, मला तिकीट का नाही? : विनोद तावडे

तिकीट कापल्यानंतर उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे (Vinod Tawde BJP) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

अमित शाहांना जरुर विचारणार, मला तिकीट का नाही? : विनोद तावडे
Follow us
| Updated on: Oct 04, 2019 | 11:35 AM

मुंबई : तिकीट कापल्यानंतर उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे (Vinod Tawde BJP) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. पक्ष जो काय आहे तो विचार करेल. निवडणुकीच्या काळात कोण चूक कोण बरोबर याचा विचार करण्याची ही वेळ नाही, असं विनोद तावडे (Vinod Tawde BJP) म्हणाले.  भाजपने विनोद तावडे यांच्या ऐवजी बोरिवलीतून सुनील राणे यांना तिकीट दिलं आहे.

“मी कार्यकर्ता आहे, तळागाळातल्या माणसांसाठी काम करायचं आहे. तिकीट का नाही मिळालं याची चर्चा मी पक्षश्रेष्ठींशी जरुर करेन. माझं काही चुकलं असेल तर त्याची माहिती घेऊन दुरुस्त करेन”, असं तावडेंनी सांगितलं.

तावडे पवारांना भेटले का, अपक्ष लढणार का, या चर्चा माझ्या मनाला शिवतही नाहीत. मी संघाचा कार्यकर्ता आहे. भाजप महायुतीला दोन तृतीयांश यश मिळेल, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

गेल्या 5 वर्षात अनेक चांगले उपक्रम, चांगल्या योजना राबवल्या. पंतप्रधान मोदींनी शिक्षण विभागाचं कौतुक केलं. पण ज्याअर्थी पक्षाला असं वाटलं तिकीट देऊ नये, तर मी त्यांच्याशी चर्चा करेन. मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केले, पण शेवटी पक्षाचा निर्णय असतो, तो निर्णय मान्य आहे. आम्ही एक टीम म्हणून काम करतो, कोण कुणाचा स्पर्धक नाही, असं तावडे म्हणाले.

निवडणूक झाल्यानंतर मी अमित शाह, संघटक मंत्र्यांशी चर्चा करेन, असं तावडे म्हणाले.

दिग्गजांचं तिकीट कापलं

भाजपने आतापर्यंत 17 विद्यमान आमदारांचा पत्ता कट (BJP No Ticket to Sitting MLA) केला आहे. विधानसभा निवडणुकांसाठी चार याद्या घोषित करत भाजपने 150 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यासारख्या दिग्गज आमदारांचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

संबंधित बातम्या 

चौथ्या लिस्टमध्ये नाव नसलं की कसं वाटतं? विद्यार्थ्यांचे तावडेंना शालजोडे  

खडसे, तावडे, मेहतांचा पत्ता कट, मुक्ताईनगरमधून खडसेंची कन्या निवडणुकीच्या रिंगणात, भाजपची चौथी यादी जाहीर  

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.