राज्यात 5 जुलैपर्यंत सर्वदूर पाऊस, मुंबईकरांची धाकधूक पुन्हा वाढणार
कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तब्बल 20 सेमी म्हणजेच एका दिवसात 200 MM पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे : राज्यात सध्या सर्वत्र पाऊस पडतोय. मात्र पुढील पाच दिवस राज्यात असाच जोरदार पाऊस पडणार आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तब्बल 20 सेमी म्हणजेच एका दिवसात 200 मिली पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण आणि गोव्यामध्ये पुढील पाच दिवस सर्वदूर पाऊस पडेल. इथे 76 टक्क्यांपर्यंत पाऊस पडेल. कोकण आणि गोव्यात 20 सेमीपर्यंत पाऊस पडेल. कोकण, गोव्यामध्ये सोमवारपासून पुढील चार दिवस 20 सेमी पाऊस पडेल आणि काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. तर पाच तारखेला पाऊस कमी होईल.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाच तारखेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात 3 तारखेला जोरदार पाऊस पडेल, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मोठ्या पावसाचा अंदाज असून 3 तारखेला काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
विदर्भात मंगळवार संध्याकाळपासून सर्वत्र पाऊस पडेल. सोमवारपासून चार तारखेपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल. विदर्भात आजपासून जोरदार पावसाची शक्यता आहे. मंगळवारपासून 20 सेमी अतिवृष्टीची शक्यता आहे. चार तारखेपर्यंत हीच परिस्थिती आहे. 4 तारखेलाही जोरदार पाऊस राहिल. 5 तारखेपासून पाऊस कमी होईल.
पुण्यातही कमी-अधिक पावसाची शक्यता आहे. 4 ते 5 तारखेलाही पुण्यात कमी-अधिक पाऊस पडेल, तर पुण्याच्या घाट परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. ताम्हिणी घाटामध्ये जोरदार पाऊस आहे. इथे 2-3 तारखेला अतिवृष्टीची शक्यता आहे.