मुंबईत नाईट शिफ्टच्या शिकाऊ महिला डॉक्टरची छेडछाड, वॉर्डबॉय अटकेत

जे जे हॉस्पिटलमध्ये एका शिकाऊ महिला डॉक्टरसोबत छेडछाड झाली आहे. धक्कादायक म्हणजे रुग्णालयातीलच वॉर्डबॉयने ही छेडछाड केल्याचा आरोप आहे.

मुंबईत नाईट शिफ्टच्या शिकाऊ महिला डॉक्टरची छेडछाड, वॉर्डबॉय अटकेत
Follow us
| Updated on: Jun 29, 2020 | 11:46 AM

मुंबई : कोरोना काळात एकीकडे डॉक्टर अहोरात्र झटत असताना, इकडे मुंबईतील जे जे रुग्णालयात संतापजनक प्रकार समोर आला आहे. जे जे हॉस्पिटलमध्ये एका शिकाऊ महिला डॉक्टरसोबत छेडछाड झाली आहे. धक्कादायक म्हणजे रुग्णालयातीलच वॉर्डबॉयने ही छेडछाड केल्याचा आरोप आहे. (J J hospital doctor molestation)

30 वर्षीय शिकाऊ महिला डॉक्टर नाईट शिफ्टमध्ये काम करत होती. त्यावेळी 45 वर्षीय वॉर्डबॉय मागून आला आणि त्याने या डॉक्टरला पकडून, तिची छेडछाड केली. याप्रकाराने भयभीत झालेल्या डॉक्टरने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर, हा प्रकार उघडकीस आला. यानंतर डॉक्टरांनी वरिष्ठांना कळवल्यानंतर, वरिष्ठांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून आरोपीवर कायदेशीर केली.

याप्रकरणी जे जे मार्ग पोलीस स्टेशनमध्ये वॉर्ड बॉयविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वॉर्डबॉयला पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या आरोपीविरोधात यापूर्वीही गुन्हा दाखल आहे. यापूर्वी एका मारहाण प्रकरणात त्याच्यावर गुन्हा आहे. त्यानंतर आता याच वॉर्डबॉयविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल झाला आहे. अटकेत असलेल्या या वॉर्डबॉयविरोधात पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार : गृहमंत्री अनिल देशमुख 

कोरोना संकटकाळात डॉक्टर, पोलीस अहोरात्र सेवा बजावत आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टरांचीच अशी अवहेलना होत असेल तर हे चिंताजनक असून, पोलिसांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मालाडमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये छेडछाड

यापूर्वीही क्वारंटाईन सेंटरमध्ये छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आला होता.  मुंबईतील मालाडच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये एका 21 वर्षीय तरुणीशी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी दोघांविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालाडच्या जनकल्याणनगरमधील न्यू भूमी पार्कच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये 15 जूनला एका 21 वर्षीय तरुणीसोबत छे़डछाड केल्याची घटना घडली. या पीडित तरुणीला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगत तिला क्वारंटाईन सेंटरमध्ये बोलवण्यात आलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर तरुणीला तुझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आला आहे. उद्या तुला घरी सोडण्यात येईल, असा सांगण्यात आले.

मात्र त्यादिवशी क्वारंटाईन सेंटरमध्ये तिच्या रुममध्ये ती एकटी असताना तिची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता.

(J J hospital doctor molestation)

संबंधित बातम्या 

लॉकडाऊनपूर्वी पळवलेली अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांनी सापडली, 26 वर्षीय तरुणाला अटक 

कोरोना पॉझिटिव्ह भासवलं, क्वारंटाईन सेंटरमध्ये बोलावून 21 वर्षीय तरुणीची छेडछाड 

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.