फेरीवाल्यांचे धक्के खात आयुक्त कल्याण-डोंबिवलीत, तासाभरात कारवाईचा बडगा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण, डोंबिवली स्टेशनला लागून असलेल्या स्कायवॉकची पाहणी केली. यादरम्यान, त्यांनी फेरीवाल्यांमुळे नागरिकांना काय आणि किती त्रास होतो याचा अनुभव घेतला.
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण, डोंबिवली स्टेशनला लागून असलेल्या स्कायवॉकची पाहणी केली (Commissioner Dr. Vijay Suryavanshi). यादरम्यान, त्यांनी फेरीवाल्यांमुळे नागरिकांना काय आणि किती त्रास होतो याचा अनुभव घेतला. या सरप्राईज दौऱ्यानंतर आयुक्तांनी अधिकाऱ्यांना एका तासाच्या आत या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या (Kalyan-Dombivali Skywalk Overview). तसेच, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार, असंही आयुक्तांनी सांगितलं (Kalyan-Dombivali Hawkers).
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनेक समस्या आहेत. त्यापैकी फेरीवाल्यांची समस्या ही सर्वात ज्वलंत समस्या आहे. स्टेशन परिसरात, स्कायवॉकवर बसलेल्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. फेरीवाल्यांनी जागा अडवल्याने कार्यालयीन वेळेदरम्यान नागरिकांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो. केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण आणि डोंबिवली स्टेशन परिसरात नागरिकांना फेरीवाल्यांमुळे किती त्रास होतो, हे ऐकले होते. मात्र आता त्यांनी स्वतः ते अनुभवले.
आयुक्त सूर्यवंशी यांनी कल्याण तसेच डोंबिवली स्टेशनला लागून असलेल्या स्कायवॉकची पाहणी केली. या पाहणीदरम्यान विशेषकरुन डोंबिवली स्टेशनच्या स्कायवॉकवर सर्रासपणे फेरीवाले बसलेले त्यांच्या निदर्शनास आले. फेरीवाल्यांमुळे स्कायवॉकवरुन नागरिकांना चालणेही कठीण होत असल्याचं आयुक्तांच्या लक्षात आलं. आयुक्तांनी स्वत: धक्के खात या स्कायवॉकची पाहणी केली.
आयुक्त सूर्यवंशी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि एका तासाच्या आत या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच, तसेच जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचंही आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं.