रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचा बळी, कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकाने स्वखर्चातून खड्डे बुजवले
पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने केडीएमसीच्या एका नगरसेवकाने स्व खर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे (KDMC corporator Kunal Patil fill road potholes).
ठाणे : रस्त्यावर पडलेले खड्डे आणि नागरिकांना होणारा त्रास हा गंभीर प्रश्न आहे. कल्याण डोंबिवलीत देखील हेच चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, रस्ता दुरुस्तीच्या कामाच्या जबाबदारी असलेल्या पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने केडीएमसीच्या एका नगरसेवकाने स्व खर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे (KDMC corporator Kunal Patil fill road potholes).
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. कल्याण शीळ रोड, मलंग रोड, पत्रिपुलासह मुख्य रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील पालिका प्रशासन लक्ष देत नाही. कल्याण मलंग रोडवरील खड्ड्यामुळे मध्यंतरी 3 जणांचा बळी गेला, तर अनेक अपघात होत आहे. त्यानंतरही पालिकेचं दुर्लक्ष असल्याचा आरोप नगरसेवक कुणाल पाटील यांनी केला. त्यामुळे त्यांनी स्वतः पुढाकार घेत स्वखर्चाने खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. यावेळी पाटील यांनी पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत महापालिकेचा निषेध केला.
याबाबत विचारले असता पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे. निधीची कमतरता नाही, असे सांगितले आहे. मात्र निधी आहे, तर खड्डे बुजवून नागरिकांना होणारा त्रास का कमी केला जात नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.
हेही वाचा :
‘रेशन वेळेत न दिल्यास दुकान सील’, डोंबिवलीत आमदार रविंद्र चव्हाणांकडून झाडाझडती
KDMC corporator Kunal Patil fill road potholes