Salon and Gym | सलून सुरु करण्यास परवानगी, केवळ केस कापता येणार, दाढी नाही!

राज्य सरकारने येत्या रविवारपासून म्हणजे 28 जूनपासून सलून आणि जिम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. (Maharashtra Salon and gym to start again)

Salon and Gym | सलून सुरु करण्यास परवानगी, केवळ केस कापता येणार, दाढी नाही!
Follow us
| Updated on: Jun 25, 2020 | 5:29 PM

मुंबई :  लॉकडाऊनमुळे बंद असलेला सलून व्यवसाय अखेर महाराष्ट्रात पुन्हा सुरु होणार आहे. राज्य सरकारने येत्या रविवारपासून म्हणजे 28 जूनपासून सलून आणि जिम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे सलूनमध्ये केवळ केस कापण्यास परवानगी असून, दाढी करण्यास परवानगी नाही. केस कापताना कारागीर आणि ग्राहक या दोघांनी मास्क लावणे बंधनकारक असेल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. जिम आणि सलून या आठवड्यात सुरु होईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.  (Maharashtra Salon and gym to start again)

महाविकास आघाडी सरकारने याबाबतचा निर्णय घेतला. (Maharashtra Salon start from Sunday). राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनदरम्यान सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र अनलॉकिंगनंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले.  

विमान सेवा, एस टी सेवा, दारु विक्रीसाठी जे सोशल डिस्टन्सिंगचे नियम आहेत, त्याप्रमाणेच नियम पाळून सलून व्यावसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी सलून व्यावसायिकांनी केली होती.

एकीकडे अन्य व्यवसायांना परवानगी दिली असताना, सलून व्यवसायाला परवानगी का नाही असा सवाल नाभिक समाज आणि सलून व्यावसायिकांनी विचारला होता. कोरोना काळातील लॉकडाऊन आणि अनलॉकिंगनंतर हळूहळू बहुतेक सेवा पूर्ववत होत आहेत. मात्र महाराष्ट्रातील सलून व्यवसाय अद्याप बंद आहेत. ही सेवा नियम-अटींसह सुरु करु द्यावी अशी मागणी सलून व्यावसायिकांकडून सातत्याने केली जात होती. त्यातच नाभिक समाज आणि सलून व्यावसायिकांनी हायकोर्टात याचिका दाखल करण्याची तयारी केली होती.

मात्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  येत्या चार-पाच दिवसात सलून सुरु करण्याबाबत निर्णय होईल, असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आता सलून सुरु करण्याचा निर्णय राज्य सराकरने घेतला आहे. 28 जूनपासून महाराष्ट्रातील सलून सुरु करण्यात येतील.

पाच सलून व्यावसायिकांच्या आत्महत्या

लॉकडाऊनमधील अर्थिक संकटामुळे राज्यभरात पाच सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. याला राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप नाभिक समाजाचे  सोमनाथ काशिद यांनी केला होता. महाराष्ट्रातील 10 लाख सलून व्यावसायिक आणि त्यांचे 40 लाख लोकसंख्या असलेल्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. दोन महिने झाले सतत अर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करीत आहोत. आजपर्यंत सरकारकडून कोणतीही अर्थिक मदत नाही. घरखर्च भागवणे, दुकान भाडे, लाईट बिल कसे भरणार असे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत, असं त्यांनी नमूद केलं.

सरकारकडूनसलून व्यावसायिकांना कोणतीही मदत अथवा मार्गदर्शन किंवा साधी विचापूसही नाही. मुख्यमंत्री नाभिक समाज आणि सलून व्यावसायिक यांचे म्हणणे ऐकण्यासाठी वेळ देत नाहीत, त्यांना भेटतही नाहीत, असाही आरोप सोमनाथ काशिद यांनी केला.

(Maharashtra Salon and gym to start again)

संबंधित बातम्या 

चार-पाच दिवसात सलूनबाबत निर्णय, मंत्री वडेट्टीवारांची माहिती, नाभिक समाजाची हायकोर्टात जाण्याची तयारी

लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प, आर्थिक तंगीला कंटाळून चंद्रपूरमध्ये सलून चालकाची आत्महत्या 

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.