मंत्रालयातील अधिकाऱ्याच्या भाऊ-वहिनीला कोरोनाची लागण, अधिकारीही टेस्टसाठी कस्तुरबात दाखल
मंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या भावाला आणि वहिनीला कोरोनाची लागण झाली आहे. नुकतंच याबाबतची माहिती समोर आली (Mantralaya Officer Corona Virus) आहे.
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली (Mantralaya Officer Corona Virus) आहे. असे असताना मंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या भावाला आणि वहिनीला कोरोनाची लागण झाली आहे. नुकतंच याबाबतची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम (Mantralaya Officer Corona Virus) विभागातील एका अधिकाऱ्याचे भाऊ आणि वहिनी नुकतंच कस्तुरबा रुग्णालयात दाखल झाले होते. त्या दोघांनाही खोकला आणि ताप होता. त्यामुळे ते दोघेही कोरोनाची चाचणी करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल झाले.
Corona | राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
या दोघांची चाचणी घेतल्यानंतर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही काही दिवसांपूर्वी अमेरिकेला जाऊन आले होते.
दरम्यान कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाचा भाऊ मंत्रालयात काम करतो. तो आणि त्याचा भाऊ एकाच इमारतीत राहतात. तसेच ते दोघेही सतत एकमेकांना भेटतात. त्यामुळे आता मंत्रालयातील तो कर्मचारी कस्तुरबा रुग्णालयात चाचणीसाठी दाखल झाला आहे.
Corona | विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द, शिक्षकांना ‘वर्क फॉर्म होम’ची परवानगी : उदय सामंत
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतं आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या 39 वर गेली आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये सार्वाधिक 9 आणि पुण्यात 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ मुंबईत 6 कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत (Mantralaya Officer Corona Virus) आहेत.
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
- पिंपरी चिंचवड – 9
- पुणे – 7
- मुंबई – 6
- नागपूर – 4
- यवतमाळ – 3
- कल्याण – 3
- नवी मुंबई – 3
- रायगड – 1
- ठाणे -1
- अहमदनगर – 1
- औरंगाबाद – 1
- एकूण 39
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
- पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
- पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
- पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
- पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
- मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
- नागपूर (1) – 12 मार्च
- पुणे (1) – 12 मार्च
- पुणे (3) – 12 मार्च
- ठाणे (1) – 12 मार्च
- मुंबई (1) – 12 मार्च
- नागपूर (2) – 13 मार्च
- पुणे (1) – 13 मार्च
- अहमदनगर (1) – 13 मार्च
- मुंबईत (1) – 13 मार्च
- नागपूर (1) – 14 मार्च
- यवतमाळ (2) – 14 मार्च
- मुंबई (1) – 14 मार्च
- वाशी (1) – 14 मार्च
- पनवेल (1) – 14 मार्च
- कल्याण (1) – 14 मार्च
- पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
- औरंगाबाद (1) – 15 मार्च
- पुणे (1) – 15 मार्च
- मुंबई (3) – 16 मार्च
- नवी मुंबई (1) – 16 मार्च
- यवतमाळ (1) – 16 मार्च
- नवी मुंबई (1) – 16 मार्च
- एकूण – 39 कोरोनाबाधित रुग्ण
Mantralaya Officer Corona Virus