धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ, जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आपल्या स्तरावर बैठक आयोजित करुन धारावी पुनर्विकास प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती आव्हाड यांनी पत्रातून केली आहे. (Minister Jitendra Awhad writes to CM Uddhav Thackeray asks for Dharawi Cluster Development)

धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ, जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us
| Updated on: May 21, 2020 | 12:01 PM

मुंबई : मुंबईला एका बुस्टर डोसची गरज आहे ,तो धारावी पुनर्विकासाचा असेल, असं मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धारावीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्याबाबत पत्र लिहिल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. (Minister Jitendra Awhad writes to CM Uddhav Thackeray asks for Dharawi Cluster Development)

“धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, आर्थिक उलाढालीला सुरुवात होईल, व्हेंटिलेटरवर असलेल्या बांधकाम उद्योगाला जीवनदान मिळेल. मुंबईला एका बुस्टर डोसची गरज आहे. तो धारावी पुनर्विकासाचा असेल, मी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे” असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले.

धारावीसारख्या सर्व जाती-धर्माच्या वस्तीच्या भागाचा विकास केल्यास तो महाविकास आघाडी सरकारसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या हितावह ठरणार आहे. याबाबतची संपूर्ण प्रक्रिया झाली असून आपण आपल्या स्तरावर बैठक आयोजित करुन धारावी पुनर्विकास प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती आव्हाड यांनी पत्रातून केली आहे.

हेही वाचा : मुंबईसाठी स्वतंत्र आणि मोठ्या पॅकेजची घोषणा करा, जितेंद्र आव्हाड यांची मागणी

कोरोनामुळे धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये कोणत्याही दर्जाच्या आरोग्य व्यवस्था नसल्यामुळे उपचार यंत्रणा पूर्णतः कोलमडून पडलेली दिसली. लोकांच्या मनात धारावीबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता धारावीच्या पुनर्विकासाएवढी सुंदर, सामाजिक, आर्थिक संधी महाविकास आघाडीला मिळणार नाही, अशा आशयाचं पत्र बांधकाम मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

देशात कर रुपाने सर्वात जास्त पैसा मुंबईतून जमा होतो. त्यामुळे मुंबईतील विविध क्षेत्रांसाठी स्वतंत्र आणि मोठया पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या आठवड्यात केली होती. (Minister Jitendra Awhad writes to CM Uddhav Thackeray asks for Dharawi Cluster Development)

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.