मीरा भाईंदरमध्ये दोन नवे कोव्हिड रुग्णालय, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 819 पदांची भरती

मीरा भाईंदर शहरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने दोन नव्या कोव्हिड रुग्णालयांना नुकतंच मान्यता दिली (Mira Bhayandar recruitment) आहे.

मीरा भाईंदरमध्ये दोन नवे कोव्हिड रुग्णालय, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 819 पदांची भरती
Follow us
| Updated on: Jun 16, 2020 | 11:47 PM

मीरा-भाईंदर : मीरा भाईंदर शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने दोन नव्या कोव्हिड रुग्णालयांना नुकतंच मान्यता दिली आहे. या दोन्ही रुग्णालयात मिळून 376 खाटा उपलब्ध होणार आहेत. या दोन्ही रुग्णांसाठी महापालिकेकडे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारीच नसल्याने आता महापालिकेने त्यांची 819 पदासाठी नेमणूक या सुरु केली आहे. येत्या शनिवारपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. (Mira Bhayandar recruitment)

मिरा भाईंदर शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1792 इतकी झाली आहे. दरम्यान सध्या रुग्णालयात 995 जणांवर उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये मृत्यूंची संख्या 88 इतकी आहे. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त रुग्ण सामावून घेण्यासाठी मीरा भाईंदरमध्ये नवीन कोव्हिड रुग्णालयाला मान्यता द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती.

या मागणीनुसार महापालिकेच्या मीरा रोड येथील प्रमोद महाजन इमारत आणि मीनाताई ठाकरे इमारत याठिकाणी अनुक्रमे 206 आणि 170 खाटांची कोविड रुग्णालये सुरु करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. यासाठी शासनाने 15 कोटी रुपयांचा निधी संमत केला आहे. याव्यतिरिक्त आणखी 450 खाटांच्या रुग्णालयाला देखील लवकरच शासनाकडून मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे .

कोव्हिड रुग्णालय सुरु करण्यास मान्यता मिळाली असली तरी रुग्णालयात आवश्यक असलेले डॉक्टर, परिचारिका तसेच इतर वैद्यकीय कर्मचारी यांची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णालय सुरु कशी करायची असा प्रश्न महापालिकेसमोर उभा आहे.

यासाठी महापालिकेने आता कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या कालावधीसाठी डॉक्टर आणि इतर कर्मचार्‍यांची करार पद्धतीने नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. ही नियुक्ती 3 महिने किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असेपर्यंत असणार आहे. इच्छुकांनी येत्या 20 जूनपर्यंत महापालिका मुख्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. (Mira Bhayandar recruitment)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update | दिवसभरात 178 कोरोनाबळी, एका दिवसातील मृत्यूचा सर्वोच्च आकडा

Devendra Fadnavis | मुंबईतील 950 पेक्षा जास्त कोरोना मृत्यू का लपवले?, फडणवीसांचा सवाल, मुख्यमंत्र्यांना पत्र

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.