मराठीत बोलण्यास ज्वेलरचा आडमुठेपणा, लेखिकेच्या आंदोलनानंतर संदीप देशपांडेंचा दुकानदाराला चोप

'महावीर ज्वेलर्स' या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केली, असा आरोप करत शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर ठिय्या मांडला.

मराठीत बोलण्यास ज्वेलरचा आडमुठेपणा, लेखिकेच्या आंदोलनानंतर संदीप देशपांडेंचा दुकानदाराला चोप
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 10:47 AM

मुंबई : मराठमोळ्या लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या मुंबईतील ज्वेलर्सला मनसेने चोप दिला. शोभा देशपांडे यांनी बारा तासांहून अधिक काळ कुलाब्यातील महावीर ज्वेलर्सच्या दुकानासमोर आंदोलन केले. दुकानदाराच्या आडमुठेपणाविरुद्ध शोभा देशपांडेंनी रात्रभर ठिय्या मांडल्यानंतर सकाळी आंदोलनस्थळी आलेले मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दुकानदाराला चोप दिला. (MNS Beats Mahavir Jewelers shop owner who denies to speak in Marathi with Writer Shobha Deshpande)

कुलाब्यासारख्या दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू भागात हा प्रकार उघडकीस आला आहे. ‘महावीर ज्वेलर्स’ या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केली, दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई केली पोलिसांना बोलवून अपमानित केले, असा आरोप करत शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर ठिय्या मांडला.

दुकानदार आणि पोलिसांनी दुकानाबाहेर काढल्यावरुन देशपांडे काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून दुकानासमोर ठाण मांडून बसल्या. पोलिसांनी अपमानित केले म्हणून मुंबई पोलीस आयुक्त स्वतः जोपर्यंत येत नाहीत आणि दुकानदार परवाना दाखवत नाही, तोपर्यंत दुकानासमोरुन न हलण्याचा पवित्रा त्यांनी घेतला.

पोलिसांचे म्हणणे ऐकून घेण्यासही त्या तयार नव्हत्या. मराठी एकीकरण समिती संघटनेच्या काही मराठी शिलेदारांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र देशपांडे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या.

पोलिसात तक्रार दाखल करु असे समजावल्यानंतर त्यांनी पोलिसांवर विश्वास नसल्याचे सांगितले. मी इथून हलणारच नाही या भूमिकेवर त्या ठाम राहिल्या. कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत त्या नव्हत्या. (MNS Beats Mahavir Jewelers shop owner who denies to speak in Marathi with Writer Shobha Deshpande)

कोण आहेत शोभा देशपांडे?

शोभा देशपांडे या लेखिका आहेत. मराठी भाषेवर त्यांचे अतोनात प्रेम असून त्या मराठीचा नेहमी आग्रह धरत असतात. त्यातूनच महावीर ज्वेलर्स दुकानाच्या गुजराती मालकासोबत त्यांचे खटके उडाले. मराठी माणसाचा अपमान केला गेला म्हणून आंदोलन करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचे वय 75 पेक्षा जास्त असून शोभा देशपांडे अन्नपाण्याविना एकाच जागी जवळपास बारा तासाहून अधिक काळ बसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

कुलाब्यातील ज्वेलर्सचा मराठीत बोलण्यास नकार, मराठी लेखिकेचे दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन

(MNS Beats Mahavir Jewelers shop owner who denies to speak in Marathi with Writer Shobha Deshpande)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.