“बसच्या गर्दीत नाही, पण रेल्वेत कोरोना होतो का?” संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला सवाल

"बसच्या गर्दीत कोरोना होत नाही, पण रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का??" असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

बसच्या गर्दीत नाही, पण रेल्वेत कोरोना होतो का? संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला सवाल
Follow us
| Updated on: Sep 17, 2020 | 8:00 AM

मुंबई : बेस्ट बसमध्ये होणाऱ्या गर्दीचा व्हिडीओ ट्वीट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला सवाल केला आहे. लोकल सुरु न केल्यास सविनय कायदेभंग करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. (MNS Sandeep Deshpande asks if they think Corona infection is increasing from Local railways than crowded BEST buses)

“बसच्या गर्दीत कोरोना होत नाही, पण रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का??” असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. खचाखच गर्दीने भरलेल्या बसचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.

लोकल लवकर सुरु करा अशी मागणी विशेषतः उपनगरात राहून दररोज कार्यालयासाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागणाऱ्या नागरिकांकडून होत आहे. हीच मागणी उचलून धरत “रेल्वे सेवा सुरु करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल” असा इशारा संदीप देशपांडे यांनी बसमधील गर्दीचा आणखी एक व्हिडीओ शेअर करत दिला आहे. (MNS Sandeep Deshpande asks if they think Corona infection is increasing from Local railways than crowded BEST buses)

पश्चिम रेल्वेवरील वसई-विरार, नालासोपारा, तर मध्य रेल्वेवरील ठाणे आणि त्यापुढील डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, बदलापूर, कसारा, कर्जत अशा भागात राहणाऱ्या नागरिकांची ऑफिस गाठताना मोठी गैरसोय होत आहे. अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्याने कार्यालयात उपस्थिती वाढवली जात आहे, मात्र प्रवासाची साधने नसल्याने बसने येण्या-जाण्यातच दिवसाचा निम्मा वेळ खर्ची पडत असल्याची तक्रार होत आहे.

लोकलमधून प्रवास करण्यास केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुभा असल्याने इतरांना बसशिवाय पर्याय नाही. एकीकडे बेस्ट बसची संख्या प्रशासनाने हळूहळू वाढवली आहे, मात्र लोकलचा भार पेलण्याइतकी ही सेवा सक्षम नसल्याने ताण वाढत आहे. कुठे खचाखच गर्दीने भरलेल्या बसने प्रवास करावा लागतो, अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. तर काही वेळा बस थांबवली जात नसल्याने अनेक तास वाट पाहत राहावी लागते. त्यामुळे लोकल लवकर सुरु करण्याची मागणी वारंवार केली जात आहे.

संबंधित बातम्या –

‘पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे मुख्यमंत्रीच मंदिरात जाऊ देत नाहीत, संदीप देशपांडेंचा निशाणा

प्रसिद्धीसाठी फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नाही, ते मुद्दाम अडकतायत का? : संदीप देशपांडे

(MNS Sandeep Deshpande asks if they think Corona infection is increasing from Local railways than crowded BEST buses)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.