वाढीव वीजबिलावरोधात मनसे महिला कार्यकर्त्या आक्रमक, आमरण उपोषणाचा इशारा

मनसे स्टाईलने आमरण उपोषण करु, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. (MNS Women Activist Angry on Lockdown electricity bill issue)

वाढीव वीजबिलावरोधात मनसे महिला कार्यकर्त्या आक्रमक, आमरण उपोषणाचा इशारा
Follow us
| Updated on: Oct 10, 2020 | 12:56 PM

नवी मुंबई : लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीजबिलामुळे सर्वच संतप्त झाले आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक पावित्रा घेतला आहे. येत्या 15 दिवसात वाढीव वीज बिल कमी केले नाही, तर मनसेच्या महिला पदाधिकारी मनसे स्टाईलने आमरण उपोषण करु, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. (MNS Women Activist Angry on Lockdown electricity bill issue)

मनसेच्या महिला सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला याबाबतचं निवेदन दिलं आहे. मनसेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री सचिवालय, नवी मुंबईतील कोकण भवन यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला 15 दिवसांचा अवधी दिला आहे. जर येत्या 15 दिवसात लाईट बिल कमी केले नाही. तर नवी मुंबई मनसे महिला शहर अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ या आमरण करु असा इशारा दिला आहे.

कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना विजेचे बिल अव्वाच्या सव्वा आले आहे. लॉकडाऊन मुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांचे लहान उद्योग धंदे बंद पडले आहेत. हातावर पोट भरणारे आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत. त्यातच महावितरणाच्या वाढीव वीजेच्या बिलामुळे जनता चिंताग्रस्त झाली आहे. महावितरण कार्यालयात अनेक ग्राहक त्यांच्या वाढीव वीज बिलाबद्दल तक्रार घेऊन गेल्यावर तेथील आधिकारी यांची साधी दखल सुध्दा घेत नाहीत.

याप्रकरणी राज्य सरकारकडे मनसेने वारंवार निवेदन दिली. मनसेनं महावितरण कार्यालये फोडली तरी महाराष्ट्र सरकार वाढीव वीज बिलाबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेताना दिसत नाही, त्यामुळे जनतेला मोठा प्रश्न पडला आहे असं मनसे महिला शहर अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ यांनी सांगितले.(MNS Women Activist Angry on Lockdown electricity bill issue)

संबंधित बातम्या : 

‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर साखरेच्या पोत्याचा ट्रक पलटी, दोन अपघातात दोघांचा मृत्यू

कोरोना व्हायरस मानवी त्वचेवर किती वेळ जिवंत राहतो? संशोधनात अंचबित करणारी माहिती समोर

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.