आई म्हणाली पबजी कमी खेळ, रागावलेल्या मुलाने घर सोडलं

मुंबई : सध्या देशभरातील तरुणांना पबजी गेमचं वेड लागलेलं आहे. या गेमच्या विळख्यात मोठ्या प्रमाणावर युवावर्ग गुरफटलेला दिसतो आहे. मागील महिन्यात पबजी गेमच्या नादात असलेल्या दोन युवकांना रेल्वेने चिरडल्याची घटना ताजी असतानाच, आता भिवंडी शहरात एका अल्पवयीन मुलाने या गेमसाठी आपलं घर सोडलं आहे. भिवंडीतील मानसरोवर येथील लेकव्ह्यू या इमारतीत राहणाऱ्या 17 वर्षीय मयुर राजेंद्र […]

आई म्हणाली पबजी कमी खेळ, रागावलेल्या मुलाने घर सोडलं
लॉकडाऊनमध्ये गेमिंग अॅपचं व्यसन जडलं, स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी थेट गोवा गाठलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

मुंबई : सध्या देशभरातील तरुणांना पबजी गेमचं वेड लागलेलं आहे. या गेमच्या विळख्यात मोठ्या प्रमाणावर युवावर्ग गुरफटलेला दिसतो आहे. मागील महिन्यात पबजी गेमच्या नादात असलेल्या दोन युवकांना रेल्वेने चिरडल्याची घटना ताजी असतानाच, आता भिवंडी शहरात एका अल्पवयीन मुलाने या गेमसाठी आपलं घर सोडलं आहे. भिवंडीतील मानसरोवर येथील लेकव्ह्यू या इमारतीत राहणाऱ्या 17 वर्षीय मयुर राजेंद्र गुळुंजकर याने पबजीच्या नादात रागावून घर सोडण्याचं टोकाचं पाऊल उचललं आहे. सतत पबजी गेम खेळत असल्याने आई रागावली, म्हणून मयुर घर सोडून निघून गेला. त्यामुळे पबजी या खेळाचे तरुण तसेच अल्पवयीन मुलांवर किती वाईट परिणाम होत आहेत, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.

भिवंडी शहरातील मानसरोवर येथील लेकव्ह्यू या इमारतीत राहणारा मयुर हा अकरावी कॉमर्समध्ये शिकणारा 17 वर्षांचा मुलगा आहे. मयुरला मोबाईलवर पबजी गेम खेळण्याचं व्यसन आहे. रात्रभर तो हा गेम खेळत राहायचा. त्यामुळे बऱ्याच वेळा त्याची आई मेघा गुळुंजकर या त्याला रागावायच्या. 28 मार्चला मयुर असाच मोबाईलवर पबजी गेम खेळत बसला होता. तेव्हा आईने त्याला रागावलं, तसेच तुझं नाव मामाला सांगते असेही म्हटलं. त्यानंतर त्याला मेघा यांनी त्याच्या बहिणिला घ्यायला भिवंडी रेल्वे स्थानकावर पाठवलं. तो घरातून दुचाकी घेऊन भिवंडी स्थानकाकडे निघाला. तिथे पोहोचल्यावर त्याने गाडी थांबवली आणि गाडीची चावी आणि मोबाईल गाडीच्या समोरील भागात ठेऊन निघून गेला.

त्यानंतर मयुरची बहीण नेहमीप्रमाणे स्थानकावर मयुर रोज जिथे थांबतो तिथे पोहोचली. मात्र, तिथे तिला मयुर कुठेही दिसला नाही. त्यामुळे तिने मयुरला फोल केला, तेव्हा तो फोन गाडीतच ठेऊन निघून गेल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने घरच्यांना याबाबत माहिती दिली. घरच्यांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र मयुर कुठेही सापडला नाही. त्यामुळे त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मयुर अल्पवयीन असल्याने पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.