मुंबईत ‘कोरोना’ पुन्हा डोके वर काढण्याची भीती, दहा दिवसात डबलिंग रेट 84 वरुन 58 वर
मागील महिनाभर मुंबईत रोज 1000 ते 1200 या दरम्यान नवे रुग्ण सापडत होते. मात्र आता 24 तासात दीड ते दोन हजाराच्या दरम्यान नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत आहेत
मुंबई : मुंबईत नियंत्रणात आलेल्या ‘कोरोना’ने पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पुन्हा घसरु लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दहा दिवसात डबलिंग रेट 84 वरुन 58 दिवसांवर आला आहे. (Mumbai Corona Doubling Rate decreases)
एकीकडे मुंबईत दररोज कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ होत आहे, तर डबलिंग रेट किंवा रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही घसरु लागला आहे. म्हणजेच वेगाने कोरोनाचे रुग्ण दुप्पट होऊ लागले आहेत.
डबलिंग रेट म्हणजे काय?
डबलिंग रेट म्हणजे कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्यास किती कालावधी लागतो. समजा आज कोरोनाचे 100 रुग्ण आहेत, तर आजपासून शंभरच्या दुप्पट अर्थात 200 इतकी कोरोना रुग्णसंख्या होण्यास लागणाऱ्या दिवसांची संख्या.
गेल्या काही महिन्यात कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी हळूहळू वाढू लागला होता. एक सप्टेंबरपर्यंत कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी 80 ते 100 दिवसांवर स्थिरावला होता. 31 ऑगस्टला तो 84 दिवस इतका होता. मात्र अवघ्या दहा दिवसात तो घसरुन तब्बल 58 दिवसांवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी रुग्णदुपटीचा कालावधी 67 दिवस होता.
मागील महिनाभर मुंबईत रोज 1000 ते 1200 या दरम्यान नवे रुग्ण सापडत होते. मात्र आता 24 तासात दीड ते दोन हजाराच्या दरम्यान नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत आहेत. वाढती कोरोना रुग्णसंख्या मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारी असून मुंबई महापालिकेपुढे आव्हान उभे राहिले आहे.
ताजी आकडेवारी काय सांगते?
मुंबई : 11 सप्टेंबर 2020 सायंकाळी 6 वाजता 24 तासात बरे झालेले रुग्ण – 1132 आजवर बरे झालेले एकूण रुग्ण- 1,29,244 बरे झालेल्या रुग्णांचा दर- 78 % एकूण सक्रिय रुग्ण- 27,626 दुप्पटीचा दर- 58 दिवस कोविड वाढीचा दर (4 सप्टेंबर- 10 सप्टेंबर)- 1.20 %
#CoronavirusUpdates 11-Sep; 6:00pm
(Mumbai Corona Doubling Rate decreases)
Discharged Pts. (24 hrs) – 1,132 Total Recovered Pts. – 1,29,244 Overall Recovery Rate – 78%
Total Active Pts. – 27,626
Doubling Rate – 58 Days Growth Rate (4 Sep-10 Sep) – 1.20%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 11, 2020
तुलनात्मक आकडेवारी :
#CoronavirusUpdates ३१ ऑगस्ट, सायंकाळी ६:०० वाजता
२४ तासात बरे झालेले रुग्ण- ९१७ आजवर बरे झालेले एकूण रुग्ण- १,१७,२६८ बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८०%
एकूण सक्रिय रुग्ण- २०,५५४
दुप्पटीचा दर- ८४ दिवस कोविड वाढीचा दर (२४ ऑगस्ट-३० ऑगस्ट)- ०.८३%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 31, 2020
(Mumbai Corona Doubling Rate decreases)