Mumbai Corona | मुंबईत प्रतिबंधित इमारतींची संख्या वाढतीच, कोणत्या विभागात किती इमारती?
राज्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णांची वाढ होतं आहे. (Mumbai Corona Patient Restricted Building)
मुंबई : राज्यात अनलॉकची प्रकिया सुरु झाली आहे. अनेक सरकारी, खासगी कार्यालय सुरु झाली आहेत. त्यामुळे मुंबईतील गर्दी वाढण्यास सुरुवात झाली असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णांची वाढ होतं आहे. (Mumbai Corona Patient Restricted Building)
मुंबईत सध्या प्रतिबंधित असलेल्या दहा हजारांहून अधिक इमारतींपैकी सुमारे पाच हजार इमारती पश्चिम उपनगरातील आहे. त्यातील सर्वाधिक 1300 इमारती या केवळ बोरिवलीतील आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर पालिका प्रशासनाने प्रतिबंधित इमारतींबाबत नवीन धोरण आणले आहे.
पालिकेच्या नव्या धोरणानुसार, एखाद्या इमारतीत जर दहापेक्षा अधिक रुग्ण असल्यास किंवा दोन अथवा अधिक मजल्यांवर रुग्ण आढळल्यास ती संपूर्ण इमारत प्रतिबंधित केली जाईल, असे आदेश दिले आहेत.
यानुसार संपूर्ण मुंबईत एकूण प्रतिबंधित इमारतींपैकी 50 टक्के इमारती या केवळ पश्चिम उपनगरात आहेत. बोरिवलीत आतापर्यंत जेवढे रुग्ण आढळले, त्यापैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण हे इमारतीतील आहेत.
मुंबईत सध्या 10 हजार 106 प्रतिबंधित इमारती आहेत. या इमारतीमध्ये जवळपास 11 लाख 7 हजार लोकसंख्या आहे. तर 649 झोपडपट्ट्या या प्रतिबंधित आहेत. या झोपडपट्टीत 31 लाख 8 हजार लोकसंख्या आहे.
कोणत्या विभागात किती इमारती प्रतिबंधित?
विभाग – इमारती
- बोरिवली – 1316
- अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम – 804
- कांदिवली – 786
- शीव, वडाळा – 762
- मालाड – 704
- मुलुंड – 672
- घाटकोपर – 602
- अंधेरी, जोगेश्वरी पूर्व – 508
- दहिसर – 450
- गोरेगाव – 423 (Mumbai Corona Patient Restricted Building)
संबंधित बातम्या :
Mumbai Corona | चाचण्यांचे प्रमाण वाढवल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढली, बीएमसीचा दावा
Mumbai Corona | अनलॉकनंतर मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत 20 टक्क्यांची वाढ, प्रशासनाची चिंता वाढली