मुंबईतील 5 स्टार हॉटेलमधील 6 कर्मचाऱ्यांना कोरोना, हॉटेलमध्ये सरकारी डॉक्टरांचं वास्तव्य
दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधील 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई : मुंबईत कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस (Mumbai Corona Patients Update) वाढत चालला आहे. दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधील 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर या 6 कर्मचाऱ्यांच्या संपर्कात येणाऱ्या इतरांना क्वारंटाईन करण्यात (Mumbai Corona Patients Update) आलं आहे.
या 6 नवीन कोरोना रुग्णांना सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. इथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हॉटेलमधील सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात असलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे, त्यामुळे हा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ज्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाचीलागण झाली आहे, त्या हॉटेलमध्ये काही सरकारी डॉक्टर्स राहात असल्याची माहिती आहे.
शुश्रुषा रुग्णालयातील 8 जणांना ‘कोरोना’
डॉक्टर, नर्स ते वार्डबॉय, दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात 8 कर्मचाऱ्यांना ‘कोरोना’ https://t.co/RjFAjw899q #ShushrushaHospital
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 12, 2020
आजच मुंबईतील दादरमध्येही शुश्रुषा रुग्णालयातील 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हे सर्व जण डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय असे शुश्रुषा रुग्णालयाचेच कर्मचारी आहेत (Mumbai Corona Patients Update). विशेष म्हणजे हे कोरोनाग्रस्त 24 ते 37 वर्ष वयोगटातील आहेत. यामध्ये दोन डॉक्टर, तर सहा नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे आठ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल काल रात्री 10 वाजताच आला, मात्र अद्याप उपचार सुरु झाले नाहीत, असा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. मुंबई महापालिका प्रशासन, पोलिस यांना बोलावूनही, कोणी दखल न घेतल्याचा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.
दादरमध्ये 19 कोरोनाग्रस्त
दादरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 19 वर पोहोचली आहे. चार दिवसांपूर्वी दादरमध्ये तीन कोरोनाग्रस्त सापडले होते. तर, शुश्रुषा रुग्णालयातील दोन परिचारिकांना आणि दादरमधील 80 वर्षीय वृद्धालाही ‘कोरोना’ची लागण झाल्याचं शुक्रवारी समोर आलं होतं. कालच्या दिवसात (शनिवार) कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळले होते. यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. आता शुश्रुषा रुग्णालयातील 8 कर्मचाऱ्यांची भर पडल्याने दादरमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 19 वर गेला आहे.
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हा आकडा 1761 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 208 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 127 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.
सर्वाधिक कोरोनाग्रस्त मुंबईत
राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबईत आहेत. एकट्या मुंबईतच कोरोनाचे 1146 रुग्ण आढळले आहेत, तर शहरातील 76 कोरोनाबाधितांचा मृत्यू (Mumbai Corona Patients Update) झाला आहे.
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |