कसाब पुलाने घात केला, चालता चालता पूल कोसळला!
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील पादचारी पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत काहींचा मृत्यू, तर जवळपास 30 जण जखमी आहेत. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रात्री 8 च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. अंजुमन इस्लाम शाळेजवळ हा ब्रिज आहे. कसाब पूल किंवा कसाब ब्रिज म्हणूनही हा पादचारी पूल ओळखला जातो. सीएसएमटी […]
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील पादचारी पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत काहींचा मृत्यू, तर जवळपास 30 जण जखमी आहेत. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रात्री 8 च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली.
अंजुमन इस्लाम शाळेजवळ हा ब्रिज आहे. कसाब पूल किंवा कसाब ब्रिज म्हणूनही हा पादचारी पूल ओळखला जातो. सीएसएमटी स्टेशन ते टाईम्स इमारतीची बाजू असा हा ब्रिज जोडतो. या ब्रिजवर नेहमीच वर्दळीची परिस्थिती असते. नेहमीप्रमाणे चाकरमान्यांची घरी जाण्याची वेळ होती, त्यामुळे या ब्रिजवर साहजिकच गर्दी होती. लोक चालत असताना अचानक भगदाड पडल्याप्रमाणे पूल कोसळला. ज्या पुलावरुन लोक चालत होते, तोच जवळपास 60 टक्के कोसळला. क्षणार्धात पुलावरील लोक खाली कोसळले. त्यामुळे एकच हाहाकार उडाला.
PHOTO: CSMT जवळ पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला
काही क्षण नेमकं काय झालंय हेच कळत नव्हतं. जो पूल कोसळला त्याच्या खालच्या रस्त्यावरही नेहमी वाहनांची वर्दळ असते. वाहने अगदी सुसाट असतात. त्यामुळे ब्रिज कोसळला त्यावेळी वाहनांची अवस्था काय होती? कोसळलेल्या ब्रिजखाली काही वाहने आलीत का? वाहनांनीही कोणाला धडक दिली का? असे प्रश्न अनुत्तरीत आहे.
कसाब पूल
मुंबईवर 2008 मध्ये 26/11 रोजी जो हल्ला झाला होता, तेव्हापासून हा ब्रिज कसाब पूल म्हणून ओळखला जातो. दहशतवादी अजमल कसाब सीएसएमटी स्टेशनवर फायरिंग करुन याच ब्रिजवरुन चालत चालत पुढे कामा हॉस्पिटलकडे गेला होता. या ब्रिजवर असताना महाराष्ट्र टाईम्सच्या फोटोग्राफरने फोटो काढण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी कसाबने त्यांच्या दिशेने फायरिंग केल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर कसाब पुढे छोट्याशा गल्लीतून कामा हॉस्पिटलकडे गेला. तेव्हापासून हा ब्रिज कसाब पूल म्हणून ओळखला जातो.
सीएसएमटीजवळ पूल कोसळला
सीएसएमटीजवळ पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली. गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास हा पादचारी पूल कोसळला. पूल कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली. नेमकं काय घडलंय हेच अनेकांना कळत नव्हतं. या दुर्घटनेत 32 जण जखमी झाले, तर अनेकांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे.
संबंधित बातम्या