Mumbai Local | तीन महिन्यांनी मुंबईची लाईफलाईन पुन्हा रुळावर, अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरु

मुंबई लोकल पुन्हा सुरु होणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलमधून पुन्हा प्रवास करता येणार (Mumbai Local restart) आहे.

Mumbai Local | तीन महिन्यांनी मुंबईची लाईफलाईन पुन्हा रुळावर, अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरु
Follow us
| Updated on: Jun 15, 2020 | 8:51 AM

(Mumbai Local restart) मुंबई : ‘लॉकडाऊन’मध्ये थांबलेली मुंबई अनलॉक करण्याच्या दिशेने टप्प्याटप्प्याने सुरुवात होत आहे. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल पुन्हा सुरु झाली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलमधून पुन्हा प्रवास करता येणार आहे. आज (15 जून) पहाटे पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, विरार, तर मध्य रेल्वेवरील ठाणे, सीएसएमटी यासारख्या स्थानकांवरून लोकल सुटल्या. मध्य रेल्वेवर 200 तर पश्चिम रेल्वेवर 130 लोकलच्या फेऱ्या होण्याची शक्यता आहे. 

मुंबईतील लोकल सुरु करावी याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंबईची लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकलचा वापर केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणारे म्हणजेच पोलीस, नर्स, डॉक्टर, पालिकेचे सफाई आणि इतर कर्मचारी, पत्रकार अशा काही ठराविक कर्मचाऱ्यांनाच  करता येणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांनी अद्याप लोकलने प्रवास करता येणार नाही. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर निवडलेल्या उपनगरी सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम रेल्वे

  • पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते डहाणू मार्गावर एकूण 73 गाड्या धावणार आहेत. यातील 8 गाड्या या विरार आणि डहाणू रोड या स्थानकादरम्यान धावणार आहेत.
  • सकाळी 5.30 ते रात्री 11.30 पर्यंत या लोकल गाड्या सुरु राहतील.
  • यातील अनेक लोकल गाड्या चर्चगेट ते विरारपर्यंत धावणार आहे. तर काही लोकल गाड्या या डहाणूपर्यंत धावणार आहेत.
  • चर्चगेट ते बोरिवली दरम्यान काही जलद लोकल सुरु धावणार आहे. बोरिवलीनंतर त्या पुढील स्थानकात धिम्या गतीने धावतील.

मध्य रेल्वे

  • मध्य रेल्वेवर लोकलच्या एकूण 200 सेवा चालवल्या जातील. यातील 100 अप मार्गावर आणि 100 डाऊन मार्गावर लोकल धावतील.
  • सीएसएमटी ते कसारा, कर्जत, कल्याण, ठाणे या स्थानकादरम्यान 130 लोकल धावणार आहेत. यातील 65 या अप, तर उर्वरित 65  या डाऊन मार्गावर धावतील.
  • काही प्रमुख स्थानकांवर या लोकल थांबवल्या जातील.

लोकलमधून प्रवासाचे काही नियम

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 1.25 लाख अत्यावश्यक कर्मचारी या लोकलमधून प्रवास करण्याची शक्यता आहे. यात पश्चिम रेल्वेच्या 50 हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुंबईतील अत्यावश्यक सेवेसाठी सुरु करण्यात येणाऱ्या लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर प्रवाशांना लोकलमध्ये प्रवास करता येणार नाही. या प्रवाशांना तिकीटासाठी तिकीट खिडक्या उघडल्या जातील. त्यावर संबंधित कर्मचाऱ्यांनी शासकीय ओळखपत्र दाखवल्यास त्याला तिकीट मिळू शकते. तसेच पासधारक तिकिटांची वैधता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Mumbai Local restart)

राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या आयडी कार्डच्या माध्यमातून त्यांना स्थानकांवर प्रवेश दिला जाईल. यानंतर कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड आधारित ई-पास दिले जातील.  जे कर्मचारी वैद्यकीय दृष्ट्या सुदृढ आहेत. त्याच व्यक्तींना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. तसेच कंटेन्मेंट झोनमधून कर्मचारी कामावर येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

  • ट्रेनमध्ये तसेच लोकलमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • रेल्वे स्टेशन परिसरात 150 मीटरपर्यंत ना फेरीवाला आणि नो पार्किंग क्षेत्र NO HAWKER & NO PARKING ZONE असणार आहे.
  • प्रत्येक स्टेशनबाहेर इमर्जन्सी सेवा म्हणून रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या : 

नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारच्या दिशेने, रुग्णवाढ कायम

पुण्यात श्रीमंत महिला, आयटीतील तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.