मुंबईच्या महापौरपदासाठी शर्यतीत कोण कोण?

महापौरपदासाठी मंगेश सातमकर, आशिष चेंबुरकर, किशोरी पेडणेकर, राजुल पटेल यांची नावं आघाडीवर आहेत.

मुंबईच्या महापौरपदासाठी शर्यतीत कोण कोण?
Follow us
| Updated on: Nov 14, 2019 | 2:15 PM

मुंबई : मुंबई महापालिका महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं आहे. मुंबई महापालिकेत 95 नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचाच महापौर होणार, हे चित्र स्पष्ट आहे. मात्र शिवसेनेत महापौरपदाचे अनेक दावेदार (Mumbai Mayor Candidates) असल्याने प्रचंड मोठी रस्सीखेच निर्माण होणार आहे.

विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गच्छंती निश्चित मानली जाते. महापौरपदासाठी मंगेश सातमकर, आशिष चेंबुरकर यांची नावं आघाडीवर आहेत. तर जुन्या फळीतील राजुल पटेल यांना अद्याप कोणतीही मोठ्या पदाची संधी मिळालेली नसल्याने त्यांचंही नाव चर्चेत होतं. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांनी केलेली बंडखोरी भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माजी महापौर आणि विद्यमान सभागृह नेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, शितल म्हात्रे, बाळा नर, रमाकांत रहाटे, सुजाता पाटेकर यांचीही नावे चर्चेत आहे. परंतु, ऐनवेळी टीम आदित्यमधील नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्यास ज्येष्ठ नगरसेवकांना पुन्हा एकदा वेटींगवर रहावे लागू शकते.

राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी चिठ्ठ्या टाकून काढण्यात आली. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह इतर महापालिकांचे महापौर, उपमहापौर तसेच पदाधिकारी, नगरविकास विभागाचे सहसचिव, अप्पर सचिव, कक्ष अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

स्पेशल रिपोर्ट : जेव्हा भाजप मुख्यमंत्रिपदावर अडले होते, तेव्हा ‘शिवसैनिक’ राणे नडले होते

आरक्षण सोडत नियम 2017 मधील तरतुदीनुसार काढण्यात आल्या. अनुसूचित जमातीची आरक्षण सोडत काढताना 2007 पासून अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेल्या आणि इतर संवर्गासाठी आरक्षण काढताना सध्या त्या संवर्गाचे आरक्षण असलेल्या महापालिकांना यातून वगळण्यात आल्याचं नगरविकास प्रधान सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांनी सांगितलं.

राज्य नगरविकास विभागाकडून राज्यातील एकूण 27 महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या पुढील पदावधीबाबतच्या आरक्षणाची सोडत काढली जाते. 2017 मध्ये महापालिकेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अडीच वर्षाची मुदत 8 सप्टेंबरलाच संपली होती. मात्र विधानसभा निवडणुकांमुळे महापौरपदाचा कालावधी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आला. अखेर मुंबई महापालिका महापौरपदाचं खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं. त्यामुळे इच्छुकांनी (Mumbai Mayor Candidates) पक्षश्रेष्ठींकडे भाऊगर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.