मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सैफी रुग्णालयात, सकाळपासून ताप आल्याने तपासणी

महापौर किशोरी पेडणेकर यांना सकाळपासून ताप असल्याने तपासणीसाठी त्या रुग्णालयात दाखल झाल्या.Mayor Kishori Pednekar corona test

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सैफी रुग्णालयात, सकाळपासून ताप आल्याने तपासणी
Follow us
| Updated on: Jun 29, 2020 | 2:09 PM

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांना सकाळपासून ताप असल्याने तपासणीसाठी त्या रुग्णालयात दाखल झाल्या. दोन दिवसांपूर्वीही त्यांची वैद्यकीय चाचणी झाली होती.  (Mayor Kishori Pednekar at saifee hospital). त्यांना ताप आणि अस्वस्थ वाटत असल्याने त्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल झाल्या.

किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊन आणि कोरोना काळात मुंबईतील अनेक रुग्णालये आणि हॉटस्पॉट्सना भेटी दिल्या. कोरोना काळात त्यांनी ग्राऊंडवर उतरुन आरोग्य कर्मचारी आणि कोव्हिड योद्ध्यांचं मनोबल वाढवण्याचं काम केलं. यादरम्यान त्यांनी केईएम, नायर, शताब्दी यासारख्या रुग्णालयांना भेटी दिल्या होत्या. इतकंच नाही तर किशोरी पेडणेकर यांनी स्वत: नर्स गणवेष परिधान करुन नायर रुग्णालयात जाऊन तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हुरुप वाढवला होता. (Mayor Kishori Pednekar at saifee hospital)

महापौर किशोरी पेडणेकर यांनी याआधी नर्स म्हणून काम केलं आहे. मुंबईतील महापालिका रुग्णालयातील परिचारिकांशी त्यांनी संवाद साधला होता. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या नर्सना प्रोत्साहन दिलं. इतकंच नाही तर रुग्ण गायब प्रकरणात त्यांनी गंभीर दखल घेऊन, आवश्यक त्या कारवाईचे आदेश दिले.

किशोरी पेडणेकर या ग्राऊंडवर असल्याने, त्यांचा लोकांशी संपर्क येत असतो. सध्या त्यांना ताप आल्याने स्वत:हून उपचारासाठी त्या रुग्णालयात दाखल झाल्या. इथे त्यांच्या विविध चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यांना अॅडमिट केलेलं नाही. केवळ त्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यांची प्रकृती पाहून त्यांना अॅडमिट व्हावं लागेल की नाही याबाबतचा निर्णय सैफी रुग्णालय प्रशासन घेणार आहे.

(Mayor Kishori Pednekar at saifee hospital)

संबंधित बातम्या 

मुंबईच्या महापौर झाल्या कोविड योद्धा, किशोरी पेडणेकर पुन्हा नर्सच्या भूमिकेत 

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.