गळ्यात चेन, डोळ्याला गॉगल, मग तोंडाला मास्क का नाही? मास्क न घालणारे किलर : महापौर
कोरोनाला हरवायला खूप वेळ लागेल," असेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. (Mumbai Mayor Kishori Pednekar On corona vaccine test)
मुंबई : राज्याची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. त्यात राज्य सरकारकडून अनलॉकची घोषणा करण्यात आली आहे. “अनलॉकमध्ये सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना काळात जे मास्क घालत नाही ते किलर आहेत. मास्क लावा अन्यथा कोरोनाला हरवायला खूप वेळ लागेल, “अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली. (Mumbai Mayor Kishori Pednekar On corona vaccine test)
“कोरोना काळात जे मास्क घालत नाही ते किलर आहे. मुंबईतील 2 टक्के नागरिक कळत नकळत इतरांना मारण्याचं काम करत आहेत. अनेक लोक गळ्यात चैनी घालतात, गॉगल लावतात, पण मास्कसाठी पैसे नाहीत, ही मानसिकता चुकीची आहे. मुंबईतील 2 टक्के अति आत्मविश्वास असलेले लोक 98 टक्के लोकांच्या जीवितास धोका निर्माण करत आहेत. मुंबईकर चांगले आहे. पण काही जणांमध्ये बेफिकरीपणा आहे. ज्यांच्या घरात मृत्यू होतो, त्याला याचा त्रास होतो आहे.”
“अनलॉकमध्ये सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे. मास्क लावा अन्यथा कोरोनाला हरवायला खूप वेळ लागेल,” असेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
मुंबईत 100 रुग्णांवर कोरोनाची चाचणी
“मुंबईत नुकतंच कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी करण्यात आली. येत्या काही दिवसात मुंबईतील नायर आणि केईएम रुग्णालयात प्रत्येकी 100 रुग्णांवर कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. यासाठी सीरम आणि आयसीएमआरच्या गाईडलाईन्सनुसार 10 ठिकाणी सेंटर सुरु केले जाणार आहे,” अशी माहिती मुंबई महापालिकेच्या महापौरांनी दिली.
“मुंबईत दोन टप्प्यात कोरोना लसीची चाचणी केली जाणार आहे. एका रुग्णाला पहिल्या दिवशी लस दिली जाणार आहे. तर दुसरी लस ही त्यानंतर 29 व्या दिवशी दिली जाईल. ही लस घेताना सर्व गाईलाईन्सचे पालन केले जाईल. मात्र जर या चाचणीदरम्यान काही अघटित घडलं तर त्या व्यक्तीला 50 लाख मिळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही,” असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
“भाजप नेते किरीट सोमय्या यांना काहीही म्हणू द्या. मी ज्या पदावर आहे, त्यावर वाद होणारच. त्यांनी पुरावे द्यावे. जे परिणाम असतील ते भोगायला तयार आहे. ज्याला वाटतंय त्यांनी चौकशी करावी. चौकशीअंती जे समोर येईल ते त्यांनी पाहावं आणि मला सांगा,” अशी प्रतिक्रिया किशोर पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांच्या आरोपावर केली. (Mumbai Mayor Kishori Pednekar On corona vaccine test)
संबंधित बातम्या :
नवी मुंबईत परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपाचार, 3 रुग्णालयांवर कारवाई
मुंबईत कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात, तीन स्वयंसेवकांना लस दिली जाणार