Unlock 2 | ‘अनलॉक 2’मध्ये दोन किमीची ‘लक्ष्मणरेषा’, काय आहेत निर्बंध?

रात्री 9 ते पहाटे 5 या वेळेत असलेल्या कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनी बाहेर फिरल्यास कडक कारवाई केली जाईल.

Unlock 2 | 'अनलॉक 2'मध्ये दोन किमीची 'लक्ष्मणरेषा', काय आहेत निर्बंध?
Follow us
| Updated on: Jun 29, 2020 | 7:43 AM

मुंबई : राज्य सरकारकडून पुनश्च हरि ओम अर्थात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अनेक परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई पोलिसांनी प्रत्येक नागरिकासाठी दोन किमीची ‘लक्ष्मणरेषा’ आखून दिली आहे. कोविड-19 चा धोका अजूनही कायम असल्याने सर्वांनी सुरक्षेसाठी वैयक्तिक काळजी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. (Mumbai Police Rules Regulations for Unlock Second Phase)

स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी राज्य शासनाने जारी केलेल्या लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे आणि खालील नियम पाळावेत असे मुंबई आवाहन पोलिसांनी सर्वांना केले आहे.

काय आहेत निर्बंध?

1. घराबाहेरील हालचाली केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच कराव्यात.

2. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे.

3. घरापासून फक्त 2 किमीच्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल. 2 किमीच्या बाहेर जाऊ नये.

4. व्यायामाची परवानगी घरापासून 2 किमीच्या परिघातील मोकळ्या जागेपुरतीच मर्यादित आहे.

5. कार्यालय किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतच 2 किमीच्या बाहेर जाण्याची परवानगी आहे.

6. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

7. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

8. सोशल डिस्टन्सिंगचे निकष न पाळणारी दुकाने इत्यादी बंद करण्यात येतील.

9. रात्री 09. 00 ते पहाटे 05.00 या वेळेत असलेल्या कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनी बाहेर फिरल्यास कडक कारवाई केली जाईल.

10. वैध कारणाशिवाय आपल्या स्थानिक भागापासून दूर आढळून येणारी सर्व वाहने जप्त केली जातील.

सर्व नागरिकांनी जबाबदारीने वागून अनावश्यक फिरणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर भटकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी काल (रविवार 28 जून) दिवसभरात 4 हजार 864 गाड्या जप्त केल्या. मरिन ड्राईव्हपासून दहिसर-मुलुंडपर्यंत ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, झोन 10 मध्ये सर्वाधिक 1 हजार 297 गाड्या जप्त  करण्यात आल्या.

संबंधित बातम्या : 

30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईत विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई, पोलिसांकडून 4 हजार 864 गाड्या जप्त

(Mumbai Police Rules Regulations for Unlock Second Phase)

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.