‘साधू-संतांच्या हत्येविरोधात आवाज उठवणंही ठाकरे सरकारच्या काळात गुन्हा’, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

'पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येविरोधात आवाज उठवणं, न्याय मागणही ठाकरे सरकारच्या काळात गुन्हा झाला आहे. राम कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. राज्यात जुलमी राजवट सुरु असल्याचा प्रत्यय आज आला', अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

'साधू-संतांच्या हत्येविरोधात आवाज उठवणंही ठाकरे सरकारच्या काळात गुन्हा', विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 2:05 PM

मुंबई: ‘पालघरमध्ये साधू-संतांच्या हत्येविरोधात आवाज उठवणं, न्याय मागणंही ठाकरे सरकारच्या काळात गुन्हा झाला आहे’, अशा शब्दात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. पालघर साधू हत्याकांड प्रकरणी भाजप आमदार राम कदम यांनी जनआक्रोश आंदोलनाचं आयोजन केलं होतं. मात्र, आंदोलनापूर्वीच पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतलं आहे. (Ram Kadam in police custody, Praveen Darekar criticizes the state government)

‘पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येविरोधात आवाज उठवणं, न्याय मागणही ठाकरे सरकारच्या काळात गुन्हा झाला आहे. राम कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. राज्यात जुलमी राजवट सुरु असल्याचा प्रत्यय आज आला’, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ‘सरकारनं कितीही मुस्कटदाबी करु द्या, कितीही लोकांना अटक करा, या राज्यात साधू-संतांसाठी, हिंदुत्वासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी भाजप आणि महाराष्ट्रप्रेमी कार्यकर्ते लढत राहतील. आपल्याला जाब विचारतील’, असा इशाराच प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

भाजप आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात

राम कदम आज (18 नोव्हेंबर) सकाळी 8.30 वाजता खार येथील आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. पालघर हत्याकांड प्रकरणाला 211 दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ ही यात्रा काढण्यात येणार होती.

मुंबई पोलिसांनी सकाळपासून राम कदम यांच्या निवासस्थानाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा हजर होता. यावेळी राम कदम यांच्या जमलेल्या कार्यकर्त्यांनी भारत माता की जय अशी घोषणाबाजी सुरु केली. मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी कारवाई करत राम कदम आणि त्यांच्या काही समर्थकांना ताब्यात घेतलं. राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

पालघर हत्याकांडाची CBI चौकशी करा- राणे

पालघर साधू हत्याकांडाचा तपास व्यवस्थित झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. तसेच राज्यातील ठाकरे सरकार हे हिंदुत्ववादी सरकार नसून हे तडजोडवादी सरकार आहे, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

पालघर हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा; नारायण राणे यांची मागणी

पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी राम कदम यांचे जनआक्रोश आंदोलन, आंदोलनापूर्वी पोलिसांच्या ताब्यात

Ram Kadam in police custody, Praveen Darekar criticizes the state government

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.