Paithani Mask | कोरोनापासून बचावासाठी मुंबईकरांची खास ‘पैठणी मास्क’ला पसंती

दादर येथे राहणाऱ्या निनाद आणि पल्लवी राणे यांनी पैठणी साडीवर असलेल्या मोरांच्या डिझाईन्सचा वापर करुन मास्क तयार केले आहेत.

Paithani Mask | कोरोनापासून बचावासाठी मुंबईकरांची खास 'पैठणी मास्क'ला पसंती
Follow us
| Updated on: Jun 13, 2020 | 12:55 AM

मुंबई : कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून वापरल्या (Paithani Mask) जाणाऱ्या मुखपट्ट्या म्हणजेच ‘मास्क’ आता पुढील काही महिने तरी आपल्या रोजच्या जगण्यातला आवश्यक घटक असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी खास फॅशनेबल मास्कची निर्मिती करण्यात येत आहे. नामांकित फॅशन ब्रॅण्ड्सपासून ते बचतगटच्या महिला उत्पादकांपर्यंत सर्वांनीच नक्षीदार, रंगीबेरंगी मास्कची निर्मिती सुरु केली आहे. मात्र, मुंबईत सध्या तीन वेगवेगळे स्तर असलेल्या ‘पैठणी मास्क’ला (Paithani Mask) मोठी मागणी आहे.

पैठणी म्हंटलं की, ती खासकरुन महिलांच्या पसंतीची असते. मात्र, हे ‘पैठणी मास्क’ पुरुषांच्याही पसंतीस पडत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे सक्तीचे केले आहे. टाळेबंदी शिथिल केल्याने अनेकजण नोकरीसाठी आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे फॅशनेबल मास्कची मागणी वाढू लागली आहे.

‘राणेज पैठणी मास्क’ हे मास्क बनवतात. ते फक्त मास्क नाही तर, पैठणीच्या कापडाच्या पर्स आणि अन्य वस्तूही बनवतात. सध्या कोरोनामुळे त्यांनी हे पैठणी मास्क बनवायला सुरुवात केली. अनेक ग्राहकांनी त्यांना लग्नसमारंभात साडीवर शोभून दिसेल असे पैठणी मास्क बनवून देण्याची मागणी केली होती. तेव्हापासून राणेज हे पैठणी मास्क मोठ्या प्रमाणात बनवू लागले, अशी माहिती हे मास्क बनवणाऱ्या निनाद राणे यांनी दिली (Paithani Mask).

महिलांचा साडीवर, ड्रेसवर मॅचिंग वस्तू खरेदी करण्याकडे कल असतो. त्यामुळे दादर येथे राहणाऱ्या निनाद आणि पल्लवी राणे यांनी पैठणी साडीवर असलेल्या मोरांच्या डिझाईन्सचा वापर करुन मास्क तयार केले आहेत. या ‘पैठणी मास्क’ची किंमत 100 रुपये आहे.

ग्राहक आवर्जून डबल कोटेड ‘पैठणी मास्क’ खरेदी करत आहेत. मग लग्न समारंभ असुदे किंवा लोकांना आहेर देण्यासाठी किंवा राजच्या वापरासाठी हे मास्क लोकांच्या पसंतीस उतरत आहेत (Paithani Mask).

संबंधित बातम्या :

मास्क कुणी आणि केव्हा वापरावं, जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या गाईडलाईन्स

नागपुरात मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी गेल्यास कारवाई, तुकाराम मुंढेंचे आदेश

पोलिसांनी जप्त केलेले मास्क, पीपीई किट्स कोरोना योद्ध्यांपर्यंत पोहोचवा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.