मुंबईतील दुकानांच्या वेळेत बदल, व्यापारी संघटनांची मागणी पालिका आयुक्तांकडून मान्य
मुंबईत आता दुकाने पूर्णवेळ सुरु ठेवता येणार आहे. मात्र सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळणे गरजेचे बंधनकारक असणार (Mumbai Shops Open timing change) आहे.
मुंबई : राज्यात ‘पुनश्च हरिओम‘ म्हणत दुसऱ्या टप्प्यात सम-विषम पद्धतीने दुकानं सुरु परवानगी देण्यात आली आहे. मात्र सकाळी 9 ते संध्याकाळी 5 असे वेळेचे बंधन घालण्यात आले होते. मात्र महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी काढलेल्या सुधारित परिपत्रकात हे निर्बंध उठवण्यात आले आहे. त्यानुसार आता दुकाने पूर्णवेळ सुरु ठेवता येणार आहे. मात्र सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळणे गरजेचे बंधनकारक असणार आहे. (Mumbai Shops Open timing change)
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेले लॉकडाऊन टप्प्याने खुले करण्यात येत आहे. मुंबईतील अनेक मंडई, दुकाने हे 5 जूनपासून सुरु करण्यात आले आहेत. यात सम-विषम पद्धतीने म्हणजे एक दिवस उजवीकडे आणि दुसऱ्या दिवशी डावीकडील दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मात्र रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी असल्याने दुकानांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत निश्चित करण्यात आली होती. पण ही वेळ अपुरी असल्याने दुकाने रात्री 8 पर्यंत सुरु ठेवण्याची मागणी व्यापारी संघटनांकडून केली जात होती.
पालिका आयुक्तांनी ही मागणी मान्य करत प्रशासनाने वेळेवरील निर्बंध आजपासून (बुधवारी 10 जून) उठवले आहेत. त्यामुळे आता दुकाने पूर्णवेळ सुरु ठेवता येणार आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे असणार आहे. वेळेचे निर्बंध हटवण्यात आले असले तरी दुकानदारांना सम-विषम पद्धतीनेच दुकान सुरु केले जाणार (Mumbai Shops Open timing change) आहे.
काय बंद?
1. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृह, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, बार, मोठी सभागृहे उघडण्यास संमती नाही.
2. केश कर्तनालये, सलून, ब्यूटी पार्लर बंद राहणार आहेत.
3. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लास अद्याप उघडणार नाहीत.
4. केंद्राने मान्यता दिली असली तरी राज्यात धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही.
5. आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.
6. रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी कायम
वाढदिवसाला पत्नीने दोन ड्रेस शिवायला दिले, उरलेल्या कपड्यातून टेलरने मास्क बनवले, गुलाबरावांच्या मॅचिंग मास्कचं रहस्यhttps://t.co/pnF9uabSZs @GulabraojiPatil
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 10, 2020
संबंधित बातम्या :
मिशन बिगीन अगेन | तिसरा टप्पा सुरु, कोणती बंधने कायम, कोणत्या नियमांना शिथिलता?
लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनचे सरकारकडे कसलेच नियोजन नाही, मनसेची टीका