वरुणराजा बरसला, मुंबई पाणीपुरवठा करणाऱ्या 7 पैकी 4 तलाव भरले

वर्षभर मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख सात तलावांपैकी तानसा तलाव ओसांडून वाहू लागला (Mumbai Tansa lake Overflow) आहे.

वरुणराजा बरसला, मुंबई पाणीपुरवठा करणाऱ्या 7 पैकी 4 तलाव भरले
Follow us
| Updated on: Aug 20, 2020 | 10:34 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. मुंबई शहरासाठी जीवनवाहिनी असलेला तसेच वर्षभर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख सात तलावांपैकी तानसा तलाव ओसांडून वाहू लागला आहे. आज (20 ऑगस्ट) संध्याकाळी 7.05 मिनिटांनी ओव्हर फ्लो झाला. (Mumbai Tansa lake Overflow)

यंदा जून, जुलै या दोन्ही महिन्यात पावसाने निराशा केली होती. त्यामुळे अनेक धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली होती. सुदैवाने ऑगस्ट महिन्यात सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला. त्यामुळे मुंबईतील सात तलावांपैकी चार तलाव भरले आहेत.

काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे मोडक सागर धरण भरले आहे. याआधी तुळशी आणि विहार तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यापाठोपाठ आता तानसा तलावही भरलं आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट लवकरच टळणार असल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्यावर्षी हा तलाव 25 जुलैला ओव्हरफ्लो झाला होता. तर त्याआधी 2018 मध्‍ये 17 जुलैला 2017 मध्ये 18 जुलैला ओव्हर फ्लो झाला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लीटर आहे. आज सकाळपर्यंत सातही तलावातील जलसाठा हा 12 लाख 62 हजार 119 दशलक्ष लीटर इतकी आहे. तो क्षमतेच्‍या 87.20 टक्‍के एवढा आहे. (Mumbai Tansa lake Overflow)

संबंधित बातम्या : 

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तिसरे तलाव ओव्हरफ्लो, धरणांमध्ये 82.95 टक्के पाणीसाठा

मुंबईकरांसाठी खूशखबर, मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओव्हरफ्लो

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.