Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संयमाचे बक्षीस! महिलेच्या मारहाणीनंतरही धैर्य, हवालदार एकनाथ पार्टे यांचा गृहमंत्र्यांकडून सत्कार

मुंबईत वाहतुकीचे नियम मोडल्याने कारवाई करत असताना हवालदार एकनाथ पार्टे यांना महिलेने बेदम चोप दिला होता.

संयमाचे बक्षीस! महिलेच्या मारहाणीनंतरही धैर्य, हवालदार एकनाथ पार्टे यांचा गृहमंत्र्यांकडून सत्कार
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 4:02 PM

मुंबई : महिलेने मारहाण केल्यानंतरही संयम बाळगणारे वाहतूक पोलिस हवालदार एकनाथ श्रीरंग पार्टे यांना ‘संयमाची बक्षिसी’ मिळाली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते पार्टेंसह त्यांच्या पत्नीचाही सत्कार करण्यात आला. पोलिस असो किंवा मुंबई महापालिकेचे कर्मचारी, त्यांच्यावर हल्ले होणे योग्य नाही, असे सांगत गृहमंत्र्यांनी कारवाईचा इशारा दिला. (Mumbai Traffic Police Head Constable Eknath Parte beaten up by lady felicitated by HM Anil Deshmukh for keeping patience)

“मुंबई पोलीस दलातील वाहतूक शाखेचे हवालदार एकनाथ पार्टे यांना कर्तव्यावर असताना मारहाण झाली. ही बाब निषेधार्ह आहे. पार्टे यांनी संयम व धैर्याने परिस्थिती हाताळली. त्याबद्दल पार्टे यांचा सत्कार केला. पोलीसही माणूस असतो, त्यांच्या भावनांचा सन्मान करा” असे आवाहन देशमुखांनी नागरिकांना केले.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील काळबादेवी परिसरात वाहतुकीचे नियम मोडल्याने कारवाई करत असताना हवालदार एकनाथ पार्टे यांना सादविका तिवारी नावाच्या महिलेने बेदम चोप दिला होता. पार्टे यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा तिने केला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत सादविका ही पार्टे यांची कॉलर पकडत मारहाण करत असल्याचे आणि त्यांचे कपडे फाडत असल्याचे दिसले होते. मात्र पार्टे यांनी संयम राखत अजिबात प्रत्युत्तर केले नाही. यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

त्यानंतर, “या बाईवर तात्काळ कारवाई करायलाच हवी, हा मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय आहे” अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. एकनाथ पार्टे यांच्यावर हात उचलणारी महिला सादविका तिवारी आणि तिचा साथीदार मोहसीन खान या दोघांनाही अटक करण्यात आली. 

याआधी, मुंबई पोलीस आयुक्तांकडूनही पार्टे यांचा सहपरिवार सत्कार करण्यात आला होता. परमबीर सिंह यांनी 10 हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला होता. तर कुलाबा विभागाच्या एसीपी लता दोंदे यांनी घटनास्थळी पार्टे यांचा गौरव केला होता.

शिवसेना दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी कॉन्स्टेबल एकनाथ पार्टे यांचा सत्कार केला होता.

संबंधित बातम्या :

VIDEO : ‘या’ बाईवर तात्काळ कारवाई करा, मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय, संजय राऊतांची मागणी

(Mumbai Traffic Police Head Constable Eknath Parte beaten up by lady felicitated by HM Anil Deshmukh for keeping patience)

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.