Mumbai Rain | आयुष्यात पहिल्यांदा मंत्रालय परिसर तुंबलेला पाहिला, तुफान पावसाने शरद पवारही अचंबित

मुंबईकरांनो काळजी घ्या, असे आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले (Sharad Pawar Supriya Sule Video On Mumbai Water Logging) आहे.

Mumbai Rain | आयुष्यात पहिल्यांदा मंत्रालय परिसर तुंबलेला पाहिला, तुफान पावसाने शरद पवारही अचंबित
Follow us
| Updated on: Aug 06, 2020 | 12:43 AM

मुंबई : मुंबईत कोसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. यामुळे मुंबईच्या हिंदमाता, किंग्ज सर्कल, सायन या सखल भागात नेहमीप्रमाणे पाणी साचले. मात्र कधीही पाणी न साचणाऱ्या नरिमन पॉईंट, मरिन ड्राईव्ह, चर्नी रोड यासारख्या दक्षिण मुंबईतील परिसरातही पाणी साचले. दक्षिण मुंबईत तुंबलेलं पाणी पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अचंबित झाले. याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांनो काळजी घ्या, असे आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. (Sharad Pawar Supriya Sule Video On Mumbai Water Logging)

सुप्रिया सुळे यांनी स्वत:च्या ऑफिशिअल फेसबुक पेजवरुन एक फेसबुक लाईव्ह केलं आहे. यात सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे यशवंतराव चव्हाण सेंटरमधून घरी जाताना दिसत आहे.

या व्हिडीओत सुप्रिया सुळे यांनी मंत्रालय परिसरातील पाणी पाहिल्यानंतर “विश्वासच बसत नाही, इतक्या वर्षात इथे कधी पाणी तुंबलेले पाहिले नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर शरद पवार यांनीही “मी पहिल्यांदा आयुष्यात इथे या भागात पाणी तुंबलेलं पाहतो आहे,” असं म्हटलं. त्यामुळे मुंबईत अवघ्या काही तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर कोलमडलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची बैठक पार पडली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक होती. या बैठकीत राज्यातील सद्यस्थिती, आर्थिक, सामाजिक घडामोडी आणि परिस्थितीजन्य आढावा घेण्यात आला.

या बैठकीला खासदार प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, दुग्धविकास मंत्री हसन मुश्रीफ यासह विविध नेते उपस्थित होते.

दरम्यान मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसह उत्तर कोकणात आज रात्रभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Sharad Pawar Supriya Sule Video On Mumbai Water Logging)

संबंधित बातम्या : 

मुंबईत कोसळधार, अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी, लोकल ट्रेन अडकल्या

मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, ताशी 70 किमी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम राहणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.