राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार, काँग्रेसचे प्रवीण छेडा यांचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबई: निवडणुकीच्या तोंडावर विविध राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आऊटगोईंग सुरुच आहे. भाजपमध्ये आज पुन्हा नव्या नेत्यांची भर पडली आहे. मुंबईतील काँग्रेस नगरसेवक प्रविण छेडा आणि नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या डॉ. भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी भाजप नेत्यांसह पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेही उपस्थित […]
मुंबई: निवडणुकीच्या तोंडावर विविध राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आऊटगोईंग सुरुच आहे. भाजपमध्ये आज पुन्हा नव्या नेत्यांची भर पडली आहे. मुंबईतील काँग्रेस नगरसेवक प्रविण छेडा आणि नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या डॉ. भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी भाजप नेत्यांसह पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेही उपस्थित होते. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आल्याचं दिसून येतं.
भारती पवार भाजपमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा भारती पवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.राष्ट्रवादीकडून दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर झाल्याने, भारती पवार यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला.
त्याचबरोबर प्रवीण छेडा यांनीही काँग्रेसला रामराम ठोकत पुन्हा घरवापसी केली. त्यांनी आज मुख्यमंत्री आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. भारती पवार, प्रवीण छेडा यांनी आज मुंबई येथे केला भाजपामध्ये प्रवेश. विनोद तावडे, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, प्रकाश मेहता, आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित pic.twitter.com/BSD99uaLII
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 22, 2019
डॉ. भारती पवार यांच्या प्रवेशामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ मजबूत झाला आहे. प्रविणभाई छेडा यांचेही आपण स्वागत करतो. सारडाजी यांनी काँग्रेसने तत्व सोडले म्हणून इतका वर्ष सेवा केलेला पक्ष सोडला आहे. संजय काकडे सुद्धा भाजपासोबत आहेत: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis pic.twitter.com/NuLc4vOdBb
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 22, 2019