कोट्यवधीचं मुखदर्शन! नीता अंबानींकडून सुनेला 300 कोटींचा हार
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीने गर्लफ्रेंड श्लोका मेहतासोबत 9 मार्चला लग्न केलं. श्लोका मेहता हिरा व्यापारी रसल मेहता यांची मुलगी आहे.आता ती अंबानी कुटुंबाची सून आहे. नुकतेच सुनेच्या मुखदर्शनाचा सोहळा पार पडला. यावेळी असं काही झालं आहे की, ते ऐकून कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या विधीसोहळ्यामध्ये सासू […]
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीने गर्लफ्रेंड श्लोका मेहतासोबत 9 मार्चला लग्न केलं. श्लोका मेहता हिरा व्यापारी रसल मेहता यांची मुलगी आहे.आता ती अंबानी कुटुंबाची सून आहे. नुकतेच सुनेच्या मुखदर्शनाचा सोहळा पार पडला. यावेळी असं काही झालं आहे की, ते ऐकून कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या विधीसोहळ्यामध्ये सासू नीता अंबानीने आपल्या सुनेला तब्बल 300 कोटी रुपयांचा हार गिफ्ट म्हणून दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, नीता अंबानी आपल्या सूनेला सर्वात वेगळं असं गिफ्ट देण्यासाठी इच्छुक होत्या. अनेक गोष्टी पाहिल्यानंतर 300 कोटींच्या हिऱ्यांचा हार नीता अंबानींना आवडला.
अनेक पिढ्यांपासून अंबानी कुटुंबात पारंपारिक दागीणा देण्याची प्रथा आहे. प्रथेनुसार घरातील मोठ्या सुनेचं कर्तव्य आहे की, तिला दिलेलं गिफ्ट हे नीट जपून ठेवावं. पण नीता अंबानी यांनी ही परंपरा बदलली आणि सूनेला काहीतरी वेगळं देण्याचा निर्णय घेतला.
या हारातील हिरे हे जगातील सर्व हिऱ्यांमधील महागडे हिरे आहेत. या हाराच्या नक्षीदार कामामुळे याची किंमत 300 कोटी रुपये आहे. सासूने दिलेल्या या अनोख्या गिफ्टमुळे श्लोकाही खूप खुश आहे. नीता अंबानीशिवाय श्लोकाची नणंद ईशा अंबानीनेही आपल्या भावाला एक अलिशान बंगला गिफ्ट केला आहे.
श्लोका आणि आकाशच्या शाही विवाहसोहळ्याने सर्व देशाचे लक्ष वेधून घेतलं होते. या विवाहसोहळ्याला अनेक देश-परदेशातील तसेच क्रीडा, बॉलिवूड आणि राजकारणातील दिग्गजांनी हेजरी लावली होती.