Nisarga Cyclone | शंभर वर्षात पहिल्यांदाच मुंबईत चक्रीवादळाची शक्यता, काय आहे निसर्ग चक्रीवादळ?
कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 3 जूनला चक्रीवादळ धडकण्याचा (Nisarga Cyclone All Update) अंदाज आहे.
Nisarga Cyclone मुंबई : कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 3 जूनला चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हरिहरेश्वरसह अलिबागला बसण्याची शक्यता आहे. बांगलादेशने या चक्रीवादळाला ‘निसर्ग’ असे नाव दिले आहे.
‘निसर्ग’ चक्रीवादळाची थोडक्यात माहिती
?अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं चक्रीवादळ निर्माण झाले आहे.
?या चक्रीवादळाला बांगलादेशने ‘निसर्ग’ नाव सुचवले आहे.
?3 जूनला उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात, रायगड, हरिहरेश्र्वर आणि दमण भागातून जाणार आहे
?रत्नागिरी, पालघरसह मुंबईवरही चक्रीवादळाचा परिणाम
? निसर्ग चक्रीवादळ आणि मुंबई
1. शंभर वर्षात पहिल्यांदाच मुंबईच्या किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकेल
2. निसर्गा चक्रीवादळाचा वेग ताशी 90 ते 125 कि.मीपर्यंत राहण्याचा अंदाज
3. निसर्गा चक्रीवादळ हे तीव्र स्वरूपाचं वादळ मानलं जातं आहे
4. समुद्र किनाऱ्यावर दोन मीटर उंचीपर्यंत लाटा उठवण्याचा अंदाज
5. मुंबई, ठाणे, रायगडच्या खोल भागात पाणी शिरण्याची भीती
6. महाराष्ट्रात पहिल्यांदा हरिहरेश्वरला धडकण्याचा अंदाज
7. मुंबईसह महाराष्ट्राच्या 7 जिल्ह्यात सर्वाधिक परिणाम
8. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये सर्वाधिक परिणाम
9. चक्रीवादळाला निसर्ग हे नाव बांगलादेशनं दिलं
10. मुंबईत सर्व समुद्रकिनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्रात निसर्ग वादळासाठी 15 एनडीआरएफच्या टीम तैनात
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत एनडीआरएफच्या तीन टीम तैनात करण्यात आली (Nisarga Cyclone All Update) आहे. यात 141 जवान आहे.
- मुंबई – 3
- रायगड – 4
- पालघर – 2
- ठाणे – 2
- रत्नागिरी 2
- सिंधुदुर्गे – 1
- नवी मुंबई 1
Cat 1 #CycloneNisarga will cross between Mumbai and Shrivardhan, Raigad tomorrow afternoon. Mumbai & surrounding area will get very heavy rains over 100mm with strong winds from tonight till tomorrow night. #MumbaiRains #CalmBeforeTheStorm pic.twitter.com/74LgmAR73S
— Mumbai Rains (@IndiaWeatherMan) June 2, 2020
? मुंबईसह कोकण निसर्ग चक्रीवादळाचा कसा सामना करणार?
1. मुंबई, हरिहरेश्वर, पालघर किनाऱ्यावर पुढच्या 12 तासात धडकणार
2. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये रेड अलर्ट
3. मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये अचानक पूर येण्याचा अलर्ट
4. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघरमध्येही अचानक पूर येऊ शकतो
5. वारे 115 ते 125 ताशी कि.मी. वेगाने वाहण्याची शक्यता
6. केमिकेल कारखाने बंद ठेवण्याचे आदेश
Cyclone Nisarga | ‘निसर्ग’ चक्रीवादळ आणि मुंबई #NisargaCyclone #Nisarga #Nisargcyclone pic.twitter.com/TSlRrO9qHZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2020
कोरोना आणि वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज
- Quick Deployment Antenna Vehicle -निसर्ग वादळाशी दोन हात करताना मोबाईल नेटवर्क गेल्यास quick deployment antenna चा वापर करण्यात येणार आहे. वादळाच्या पार्शवभूमीवर दूरसंचारचं नेटवर्क गेल्यास या वेहकलचा उपयोग होणार आहे
- सॅनिटायझर व्हॅन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना बोटीमध्ये बसवण्यापूर्वी बोट सॅनिटाईज केली जाणार आहे. यासाठी 500 लिटरच सॅनिटायजरची गाडी असणार आहे. लोकांना एखाद्या मोकळ्या ठिकाणी ठेवण्याची वेळ आली तर ती जागा वापरापूर्वी सॅनिटाईज केली जाणार आहे.
- इक्विपमेंट व्हॅन – झाड पडल्यास, इमारत पडल्यावर किंवा विजेचे खांब पडल्यास ते कापण्यासाठी व्हॅनमध्ये कटर्स ठेवण्यात आली आहेत. स्लॅब एयर लिफ्टर (एखादी व्यक्ती स्लॅबमध्ये फसली असेल तर तिला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत होणार आहेत.
- बोट – मुंबईसाठी एनडीआरएफकडे 9 बोट आहेत. एका बोटमध्ये किमान 10 ते 12 जणांना बसता येईल एवढी क्षमता आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 4 ते 5 जणांना बसवले जाणार आहे. तसेच जवानांना घेऊन जाण्यासाठी बस तैनात आहे. यातही सोशल डिस्टंन्सिंग पाळलं जाणार आहे.
? पालघरमध्ये सतर्कतेचा इशारा
पालघर जिल्ह्याला कोरोनाचा फटका बसणार आहे. वसईमधील अर्नाळा किल्ला, अर्नाळा गाव, पाचूबंदर, कळंब, राजोडी, वसई किल्ला, सुरुची बाग, कामन, ससूनवघर, निर्मल, चांदीप, उसगाव, भालीवली या ठिकाणी वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे समुद्रलगतच्या कोळी, मच्छिमार नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वसईसह पालघरमध्ये SDRF ची तैनात करण्यात आली आहे. यात एकूण 36 लोक आहेत.
चक्रीवादळात सुरक्षित राहण्याचे उपाय #NisargaCyclone pic.twitter.com/DGvpLk594i
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2020
? रत्नागिरीत हाय अलर्ट
⭕रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात हायअलर्ट ⭕किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सुचना ⭕रत्नागिरी जिल्ह्यात एनडीआरएफची टिम गुहागरात दाखल ⭕वादळाच्या शक्यतेने 3 जून ला जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश ⭕गरज भासल्यास लोकांचे स्थालांतर ⭕पुढील ४८ तास रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्वाचे
निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेली तयारी: pic.twitter.com/nsZAFkwQPm
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 2, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचना
- महाराष्ट्राच्या पश्चिम किनारी पट्टीला निसर्ग वादळ 3 जूनला पोहोचणार
- मुंबईच्या सखल भागातील झोपड्डपट्टीवासियाना स्थालांतरित करण्याच्या सूचना
- मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात सतर्कतेचा इशारा
- मच्छिमारांना समुद्रातून परत बोलवण्यात आले आहे
- जिल्हाधिकाऱ्यांना जीवितहानी रोखण्यासाठी आदेश
- एनडीआरएफच्या 16 तुकड्यापैकी 10 तुकड्य़ा तैनात
- एडीआरएफच्या सहा तुकड्य़ा राखीव
- कच्चा घरात राहणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले
- पक्की निवासगृहे तयार ठेवण्य़ात आली आहे
- नॉन कोविडसाठी रूग्णालय उपब्लध करण्याचे निर्देश
? रायगडमध्ये अलर्ट
निसर्ग चक्रीवादळ सकाळी 5.30 वाजता वादळाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे. ताशी 100 ते 125 वाऱ्याचा वेग असण्याची शक्यता आहे. या दरम्यान वादळी पाऊसही पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊन मोठी हानी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, उरण समुद्रकिनाऱ्यावरील 62 गावांना वादळाची झळ बसणार आहे. या गावांची लोकसंख्या 1 लाख 77 हजार आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ टीम अलिबाग, श्रीवर्धन तालुक्यात दाखल झाली आहे. या टीममध्ये एकूण 22 जवान आहेत. तर उरण नागरी संरक्षण दल व मुरुडमध्ये कोस्टगार्ड तैनात ठेवण्यात आले आहेत.
निसर्ग चक्रीवादळाबाबत तटरक्षक दलामार्फत मच्छिमारांना समुद्रात सूचना, विमानं आणि बोटींमार्फत सूचना देऊन बोटी किनाऱ्याला लावण्याचं आवाहन, महाराष्ट्र, गोवा, गुजरातच्या सीमेवर मच्छीमारांना सूचना @Ksbsunil pic.twitter.com/xJO80KaY8r
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2020
या सर्व टीम सध्या परिसराची पाहणी करणार आहे. कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांचे शाळा, समाज मंदिर, अंगणवाडी तसेच इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. वादळानंतर मोठ्या आकाराचे वृक्ष तोडण्यासाठी लागणारी सर्व मशिनरी, इमर्जन्सी बोट, कटर, रोप अशा सर्व सामग्री तयार करण्यात आली (Nisarga Cyclone All Update) आहे.
संबंधित बातम्या :
Cyclone Nisarga live : निसर्ग चक्रीवादळ, NDRF ची पथकं तैनात, समुद्र किनारी वादळापूर्वीची शांतता
चक्रीवादळाचा संभाव्य धोका, मुंबईकरांसाठी महापालिकेच्या महत्त्वाच्या सूचना