Konkan Ganeshotsav | कोकणबाबत प्रशासन-मंत्र्यांमध्ये चर्चा, अन्य कोणाला निमंत्रण नाही, अनिल परबांचं राणेंना उत्तर
गणेशोत्सवानिमित्त कोकणात प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी आढावा बैठक आयोजित केली होती.
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात प्रवास करण्याची परवानगी (Nitesh Rane Vs Anil Parab) देण्याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीला आमंत्रण न दिल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. ‘गणेश चतुर्थीसाठी बोलावलेली बैठक ही फक्त शिवसेनेची आहे का’, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. तर, ‘आम्ही कोणाला निमंत्रण पाठवले नव्हते’, असं म्हणत शिवसेना नेते अनिल परब यांनी नितेश राणेंना उत्तर दिलं आहे (Nitesh Rane Vs Anil Parab).
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
नेमकं प्रकरण काय?
कोकणातील गणेशोत्सवासाठी प्रवासाबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नेतृत्त्वात बैठक पार पडली. या बैठकीला राणे कुटुंबीयांनी आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. त्यावरुन नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ‘सर्वपक्षीयांना निमंत्रण का नाही? एकतर्फी चर्चा करुन लोकांवर नियम का लादत आहेत?, असे सवाल नितेश राणेंनी उपस्थित केले. याबाबत ट्विट करत नितेश राणेंनी त्यांची नाराजी व्यक्त केली.
नितेश राणे काय म्हणाले?
“परिवहन मंत्र्यांनी गणेश चतुर्थीसाठी बोलावलेली बैठक ही फक्त शिवसेनेची आहे का? बैठकीचं आमंत्रण नाही किंवा माहितीही नाही! असे नियोजन करुन कोणाचा फायदा होणार आहे? कोकणचं अजून किती नुकसान करणार हे सरकार?, असं ट्विट नितेश राणेंनी केलं (Nitesh Rane Vs Anil Parab).
परिवाहन मंत्री नी गणेश चतुर्थी साठी बोलावलेली बैठक हि फक्त शिव सेनेची आहे का ?
बैठीकीच आमंत्रण नाही किव्हा माहिती हि नाही !
असे नियोजन करून कोणाचा फायदा होणार आहे ?? कोकणाच अजुन किती नुकसान करणार हे सरकार ??
— nitesh rane (@NiteshNRane) July 14, 2020
अनिल परब यांचं नितेश राणेंना उत्तर
“ही बैठक फक्त शिवसेनेची नव्हती, तर तिथे राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित होते. प्रशासनासोबत मंत्र्यांची चर्चा होती. या बैठकीसाठी आम्ही कोणाला निमंत्रण पाठवले नव्हते”, असं म्हणत अनिल परब यांनी नितेश राणेंना प्रत्युत्तर दिलं.
“या बैठकीत आम्ही कोकणातील कोरोना परस्थितीचा आढावा घेतला. चाकरमान्यांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देऊन त्यावर निर्णय घेऊ. चाकरमान्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी सरकार घेईल”, असं अनिल परब यांनी सांगितलं.
बैठकीत काय ठरलं?
“कोकणातील लोकप्रतिनिधींबरोबर बैठक झाली. सगळ्यांची मते जाणून घेतली. मुंबईवरुन जाणारे लोक गावाला कसे जाणार, क्वारंटाईन कसे करायचं?, सगळ्या मुद्यांवर चर्चा झाली. याचा सारांश मुख्यमंत्र्यांना देणार, मग ते यावर निर्णय घेतील”, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
“जे निकष आहेत, ज्या गाईडलाईन्स आहेत ते जिल्हाधिकारी ठरवतात. ज्यांना प्रवास करायची परवानगी मिळेल, त्यांना बसेसही मिळतील”, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
“महत्वाचं म्हणजे ज्यांची घर बंद आहे, अशा लोकांना नियम आणि अटी काय असणार? पासेस व्यवस्था याची चर्चा बैठकीत झाली. ज्यांना जायचं आहे, त्यांना पाठवलं पाहिजे. अटींचा विचार करुन पाठवलं पाहिजे. कोकणात गणपतीसाठी ज्यांना जायचं आहे. त्यासाठी नियम आणि अटी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यावर ठरवू”, असंही त्यांनी सांगितल.
“आम्हाला कोकणातील लोकांच्या जीवाची पण काळजी आहे. चक्रीवादळामुळे कोकणात अनेक ठिकाणी खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत झाला आहे. गणपती आधी वीज पुरवठा सगळीकडे सुरळीत होईल”, असे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिले.
मंत्रालयातील नव्या प्रशासकीय इमारतीत ही बैठक पार पडली. या बैठकीला कोकणातील शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे, शिवसेना आमदार योगेश कदम, रमेश लटके, भरत गोगावले, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर हे सर्व उपस्थित होते. तसेच, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून इतर काही आमदारही या बैठकीत सहभागी झाले होते.
Nitesh Rane Vs Anil Parab
संबंधित बातम्या :