Corona Update | दिलासा! विलगीकरणातून बरे झालेल्यांची संख्याही वाढली; मुंबई महापालिकेचं मोठं यश

आतापर्यंत बाधितांच्या संपर्कात आलेल्यांपैकी 33 लाख 71 हजारांहून अधिक संशयित विलगीकरणातून मुक्त झाले आहेत.

Corona Update | दिलासा! विलगीकरणातून बरे झालेल्यांची संख्याही वाढली; मुंबई महापालिकेचं मोठं यश
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 5:13 PM

मुंबई : एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केलेल्या संशयितांचा आकडाही मोठा आहे. आतापर्यंत बाधितांच्या संपर्कात आलेल्यांपैकी 33 लाख 71 हजारांहून अधिक संशयित विलगीकरणातून मुक्त झाले आहेत (Number Of Those Who Recovered From Quarantined Increased).

मात्र, कोरोनाचा संसर्ग पसरु नये यासाठी आजघडीला सव्वाचार लाखांहून अधिक व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. संसर्गावर नियंत्रण मिळावे यादृष्टीने कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा मोठ्या संख्येने शोध घेण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले होते.

त्यानुसार, संशयित रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत 38 लाख 4 हजार 170 संशयित रुग्ण पालिकेला सापडले आहेत. यापैकी 16 लाख 40 हजार 748 संशयित रुग्ण अतिजोखमीच्या, तर 21 लाख 63 हजार 422 कमी जोखमीच्या गटात होते.

या शोधमोहिमेत सापडलेल्या 33 लाख 71 हजार 112 संशयित रुग्णांचा विलगीकरणाचा काळ पूर्ण झाला असून विलगीकरणातून ते मुक्त झाले आहेत. ही एक दिलासादायक बाब आहे.

मुख्यमंत्र्यांचा जनतेला सतर्कतेचा इशारा

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला. जगभरात येत असलेली  कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, असा इशारा देतानाच मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Number Of Those Who Recovered From Quarantined Increased

संबंधित बातम्या :

गोविंदबागेत दिवाळी साध्या पद्धतीने, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम रद्द

कोरोनाचा फटका, नागपूरमध्ये फटाके व्यावसायिकांची संख्या घटली, महापालिकेकडून 582 जणांना परवानगी

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.