ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा आंदोलन करु, प्रकाश शेंडगेंचा इशारा
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. मुख्यमंत्र्यांनी लक्ष न दिल्यास आंदोलन करु, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
मुंबई : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या (OBC Leader Prakash Shendge On Maratha Reservation). मुख्यमंत्र्यांनी लक्ष न दिल्यास आंदोलन करु, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. आज मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात अंतरिम सुनावणी झाली. याबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर ओबीसी समाजाचीही बाजू मांडायलाच हवी, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली आहे (OBC Leader Prakash Shendge On Maratha Reservation).
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
प्रकाश शेंडगे काय म्हणाले?
“मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलची अंतिम सुनावणी सुरु आहे. पण, ओबीसी समजाचं काय? हे सरकारही आमच्याकडे दुर्लक्षच करत आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं, म्हणून त्यांना भेटीसाठी वेळ मागितली आहे. जर असं झालं नाही, तर 20 ते 25 तारखेपर्यंत आंदोलन करणार”, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला.
तसेच, “ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. राज्य सरकारने आमची बाजू मांडायलाच हवी”, अशी मागणीही प्रकाश शेंडगे यांनी केली आहे (OBC Leader Prakash Shendge On Maratha Reservation).
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
मराठा आरक्षणाच्या अंतरिम आदेशावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने तूर्तास कोणताही अंतरिम आदेश किंवा वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती दिलेली नाही. आता मराठा आरक्षणप्रकरणी 27 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे. 27,28 आणि 29 अशी तीन दिवस सुनावणी होईल.
कोर्टाने वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती न दिल्याने हा मराठा समाज आणि राज्य सरकारला तूर्तास मोठा दिलासा आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सने आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली.
Maratha Reservation Live | मराठा आरक्षण : तूर्तास अंतरिम आदेश नाही, 27 जुलैपासून नियमित सुनावणी
?कोर्टात नेमकं काय झालं? ?सरकारने बाजू काय मांडली? ?आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद काय?https://t.co/BPyAXOys3T
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 15, 2020
OBC Leader Prakash Shendge On Maratha Reservation
संबंधित बातम्या :
‘मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावू नये’, वडेट्टीवारांचं नाव न घेता संभाजीराजेंचं प्रत्युत्तर