केंद्राने POP वरील बंदी उठवावी, मूर्तिकारांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला
पेणमधील मूर्तिकार आपल्या विविध मागण्यांचं निवदेन घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. (Pen Idol Maker Delegation Meet Raj Thackeray)
मुंबई : पेणमधील मूर्तीकार आपल्या विविध मागण्यांचं निवदेन घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर ही भेट होणार आहे. या भेटीत हे सर्व मूर्तीकार राज ठाकरेंना निवेदन देत चर्चा करणार आहेत. (Pen Idol Maker Delegation Meet Raj Thackeray)
राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी मूर्तिकारांचं शिष्टमंडळ भेट घेणार आहे. हे सर्व मूर्तीकार पेणमधील आहे. पेण हे मूर्ती तयार करण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखलं जातं. केंद्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) वापरण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे मूर्ती घडवणं मूर्तिकारांना कठीण झालं आहे. या पार्श्वभूमीवर ही बंदी उठवावी, या मागणीसाठी पेणमधील मूर्तीकार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत आहेत.
मूर्ती घडवण्यासाठी POP मिळत नाही. त्यामुळे POP वरील बंदी उठवावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी राज ठाकरेंकडे केली आहे. मी सरकार दरबारी हा विषय मांडेन, अशी भूमिका राज ठाकरे घेऊ शकतात, असे सांगितलं जात आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनलॉक सुरु आहे. त्यानंतर डॉक्टर, कोळी महिला, जिम मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी या सर्वांनी राज ठाकरेंकडे विविध मागण्यांचं साकडं घातलं होतं. यानंतर काही समस्यांवर तोडगाही निघाला होता. त्यामुळे अनेकांना विश्वास वाटत आहे.
काही दिवसांपूर्वी डोंगरी येथील कोळी महिलांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. डोंगरी मार्केटमध्ये बेकायदा मासेविक्रेत्यांनी अतिक्रमण केलं असून हे अतिक्रम हटवण्याची मागणी या महिलांनी राज ठाकरे यांच्यापुढे यावेळी मांडली होती.
राज ठाकरेंना आतापर्यंत कोण कोण भेटलं?
- मूर्तीकार
- डबेवाले
- जिमचालक
- कोळी महिला
- वीजबिल ग्राहक
- पुजारी
- डॉक्टरांचे शिष्टमंडळ
- ‘अदानी’चे अधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला! (Pen Idol Maker Delegation Meet Raj Thackeray)
संबंधित बातम्या :
डोंगरीतील कोळी महिला ‘कृष्णकुंज’वर, परप्रांतीय मासेविक्रेत्यांना हटवण्यासाठी राज ठाकरेंना साकडे