Dahi Handi 2020 | यंदा प्रताप सरनाईक यांची प्रसिद्ध दहीहंडी रद्द, आयोजनाचा खर्च ‘कोरोना’ उपचारासाठी देणार
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा संस्कृती युवा प्रतिष्ठानची प्रसिध्द दहीहंडी रद्द करण्यात आली (Pratap Sarnaik Dahi Handi Cancelled) आहे.
मुंबई : यंदा कोरोनामुळे गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. गणेशोत्सवाप्रमाणे महाराष्ट्रात दहीहंडीचा सणही अतिशय उत्साहात साजरा केला जातो. पण यंदा कोरोनामुळे हा सण साजरा करणे शक्य होणार नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा संस्कृती युवा प्रतिष्ठानची प्रसिध्द दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबतची माहिती दिली. (Pratap Sarnaik Sanskriti Yuva Pratishthan Dahi Handi Cancelled)
तसेच या आयोजनासाठी येणारा सर्व खर्च कोरोनासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच घरोघरी जाऊन 1 कोटींची औषधे वाटण्याचा निर्णयही प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कोरोनासाठी लागणाऱ्या रुग्णवाहिका मीरा भाईंदर आणि ठाण्यात देण्यात येणार आहे, असेही प्रताप सरनाईक म्हणाले.
प्रो गोविंदा ही संकल्पना संस्कृती युवा प्रतिष्ठानने आणली. या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन तरुण पुढे येत असून दहीहंडीत तब्बल 9 थरांचा जागतिक विक्रम झाला. त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली आहे. त्यामुळे दरवर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी अतिशय उत्साहात साजरी होते. हजारो गोविंदा, नागरिक या दहीहंडीला उपस्थिती दर्शवतात. दहीहंडीचा समावेश खेळ या प्रकारात समावेश व्हावा, यासाठी प्रताप सरनाईक यांनी पाठपुरावा केला होता. तसेच दहीहंडीला शासनमान्यता प्राप्त करुन दिली. त्यानंतर प्रो गोविंदा सुरू केला.
दरवर्षी दहीहंडी उत्सव प्रचंड उत्साहात साजरा होतो. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता दहीहंडी रद्द करणे, हेच प्रत्येकाच्या आरोग्याच्या आणि समाजाच्या दृष्टीने योग्य आहे.
दहीहंडी उत्सवासाठी मोठमोठी पारितोषिके देण्यात येतात. या रक्कमाही मोठ्या असतात. मात्र, हा सण साजरा करताना मोठ्या प्रमाणावर तरुण गोविंदा एकत्र येतात. जर गोविंदा उत्सवात गर्दी झाली, तर सध्या सरकार करत असलेल्या उपाययोजना फोल ठरण्याची शक्यता आहे.
या सर्व बाबींचा विचार करुन आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार यंदा आम्ही संस्कृती प्रतिष्ठानची हंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध प्रकारची पारितोषिके तसेच इतर नियोजनापोटी होणारा खर्च कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका तसेच इतर उपाययोजनांसाठी वापरणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. इतर गोविंदा उत्सव मंडळेही यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करुन आयोजनाचा खर्च कोरोनाबाधितांसाठी वापरतील, अशी आशा प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. (Pratap Sarnaik Sanskriti Yuva Pratishthan Dahi Handi Cancelled)
चिंचपोकळीच्या चिंतामणीची 100 वर्षांची परंपरा खंडित, आगमन सोहळा रद्द, मूर्तीबाबतही महत्त्वाचा निर्णयhttps://t.co/IftIwgZB8u #ChinchpoklichaChintamani #COVID19India
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 15, 2020
संबंधित बातम्या :
23 फुटांऐवजी 3 फुटांची गणेशमूर्ती, ‘परळचा राजा गणेश मंडळा’चे चार स्तुत्य निर्णय
चिंचपोकळीच्या चिंतामणीची 100 वर्षांची परंपरा खंडित, आगमन सोहळा रद्द, मूर्तीबाबतही महत्त्वाचा निर्णय