मुंबईकर तरुणांनो, मतदार यादीत नाव नोंदवा, मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर
मुंबईत मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाकडून 17 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 या कालावधीत हरकती आणि दावे स्वीकारण्यात येणार आहेत.
मुंबई : मुंबईत मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाकडून 17 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 या कालावधीत हरकती आणि दावे स्वीकारण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांची मतदार म्हणून नोंदणी झाली नाही आणि ज्यांचे वय 1 जानेवारी 2021 रोजी 18 वर्ष पूर्ण होत आहे त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. अशा नागरिकांनी फॉर्म 6 भरुन द्यावा, असं आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे (Process of New Voter registration and correction started in Mumbai).
मृत आणि स्थलांतरीत मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात येणार आहेत. त्यासाठी फॉर्म 7 भरुन द्यावा लागणार आहे. तसेच मतदार यादीत नाव, वय, लिंग या बाबी चुकीच्या नोंदवल्या असल्यास त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी फॉर्म 8 भरुन द्यावा लागणार आहे.
या मोहिमेमध्ये मतदार यादी अचूक आणि निर्दोष होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी www.nvsp.in या पोर्टलवर भेट द्यावी लागेल. अधिक माहितीसाठी 1950 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करता येणार आहे. मतदार यादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे अथवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
पदवीधर मतदारसंघात मतदानाचा हक्क कुणाला?; कसा येतो आमदार निवडून?
नवी मुंबईच्या मतदार यादीत गोंधळ, एकच फोटो तीन ठिकाणी, गावात नसलेल्यांची नावं यादीत
मतदार पडताळणी कार्यक्रमात हलगर्जीपणा, तब्बल 71 शिक्षकांवर गुन्हे, राज्यातील सर्वात मोठी कारवाई
व्हिडीओ पाहा :
Process of New Voter registration and correction started in Mumbai