गाड्यांचा नंबर, पहिली सभा ते उमेदवार यादी, राज ठाकरेंचा लकी नंबर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray lucky number 9 ) हे येत्या 9 तारखेपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत.

गाड्यांचा नंबर, पहिली सभा ते उमेदवार यादी, राज ठाकरेंचा लकी नंबर
Follow us
| Updated on: Oct 05, 2019 | 5:29 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray lucky number 9 ) हे येत्या 9 तारखेपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. ठाण्यात मनसेची पहिली (Raj Thackeray lucky number 9 ) सभा होईल. पहिल्या सभेसाठी मुहूर्त मनसेने आपला लकी नंबर 9 निवडला आहे. राज ठाकरे हे 9 हा अंक लकी मानतात. त्यामुळे मनसेचे महत्त्वाचे निर्णय, शुभारंभ हा 9 या नंबरभोवती फिरताना दिसतो.

राज ठाकरे किंवा मनसेचा 9 नंबरवर दृढ विश्वास आहे, याची अनेक उदाहरणे आहेत. शिवसेना सोडण्यापासून ते मनसेच्या घोषणेपर्यंत, गाडीच्या नंबरपासून ते विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यापर्यंत सर्वत्र 9 हाच नंबर दिसतो.

राज ठाकरेंचा लकी नंबर 9

  • 27 (2+7) नोव्हेंबर 2005 : शिवसेना सोडण्याची घोषणा
  • 18 (1+8) डिसेंबर 2005 : शिवसेना सोडली
  • 9 मार्च 2006 : महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या स्थापनेची घोषणा
  • 18 (1+8) मार्च 2006 : शिवतीर्थावरील पहिली सभा

राज ठाकरे यांच्या मनसेचं राजकारण 9 अंकाभोवतीच फिरते. कारण उमेदवार निवड, उमेदवारांची संख्या या सर्वांशी  9 या अंकाचा मेळ घालण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येतं.

मनसेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली ती 27 उमेदवारांची. त्यामुळे 2+7 = 9 इथेही 9 चं गणित जुळून येतं. दुसरी उमेदवार यादी – 45 , 9 तारखेला ठाण्यातून प्रचाराला सुरुवात, असा सर्व 9 या अंकाशी  मेळ घातल्याचं दिसून येतं.

गाड्यांचे नंबर, मुलाच्या लग्नाचा मुहूर्त

राज ठाकरे यांच्या सर्व गाड्यांचा नंबर 9 आहे. इतकंच काय त्यांचा मुलगा अमितच्या लग्नाचा मुहूर्तही 27 जानेवारी (2+7) दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी (1+2+5+1 = 9) होता.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.