भाजपवाले म्हणतात, राष्ट्रवादी-काँग्रेस मला वापरुन घेतायत, पण मी वेडा नाही : राज ठाकरे
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून मोदी सरकारविरुद्ध रणशिंग फुंकलंय. ज्या व्यक्तीवर विश्वास राहिला नाही, त्याला पुन्हा निवडून देण्याची गरज नाही, असं म्हणत त्यांनी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन केलंय. माझ्या प्रचाराचा फायदा आघाडीला होईल, तर तो होऊ द्या, असंही राज ठाकरे म्हणाले. शिवाय भाजपच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. कुणी माझा वापर […]
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून मोदी सरकारविरुद्ध रणशिंग फुंकलंय. ज्या व्यक्तीवर विश्वास राहिला नाही, त्याला पुन्हा निवडून देण्याची गरज नाही, असं म्हणत त्यांनी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन केलंय. माझ्या प्रचाराचा फायदा आघाडीला होईल, तर तो होऊ द्या, असंही राज ठाकरे म्हणाले. शिवाय भाजपच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. कुणी माझा वापर करुन घेईल एवढा मी वेडा नाही, असं ते म्हणाले.
भाजप सरकारविरोधात राज्यात 10 सभा घेणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं. मोदींनी 2014 च्या तुलनेत शब्द बदलले आहेत, नोटाबंदीने चार कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे देश संकटात आहे. देश संकटात असताना भूमिका बदलावी लागते, असं म्हणत त्यांनी आघाडीचा प्रचार करणार असल्याचं जाहीर केलं.
राज ठाकरे यांनी मोदींची जुनी भाषणं आणि सत्ता मिळाल्यानंतरचीही भाषणं दाखवली. जम्मू काश्मीरमध्ये या सरकारच्या काळात जवानांवर अत्याचार झाला, मार खावा लागला, असं म्हणत त्यासंबंधित व्हिडीओही राज ठाकरेंनी दाखवले. मोदी निवडणूक जिंकण्यासाठी युद्धाची परिस्थिती निर्माण करतील मी असं आधीच म्हटलं होतं आणि ती परिस्थिती आज आली आहे. पुलवामा हल्ला झाला, 40 जवान शहीद झाले, असा घणाघाती आरोपही राज ठाकरेंनी केला.
भाजपवाल्यांची कुजबुज सुरु आहे की राज ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणे वापरून घेत आहेत. मी इतका वेडा नाही. बरं मी माध्यमांशी बोललो नसताना देखील मनसेला किती जागा मिळणार ह्याच्या चर्चा सुरु झाल्या. मोदी आणि शाह मुक्त भारत व्हावा म्हणून न निवडणूक न लढवता मी महाराष्ट्रभर सभा घेणार आहे. त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला तर झाला, असं राज ठाकरे म्हणाले.
1971 ला बांगलादेश मुक्तीच्या लढाईनंतर राष्ट्रीय स्वयंकसेवक संघाने इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता. 1977 ला काँग्रेससा मतदान करणारे मतदार आणीबाणीनंतर जनता पक्षाकडे वळले. 1984 ला इंदिरा गांधींच्या हत्येनंतर हेच झालं. देश संकटात असतो तेव्हा वेगळा विचार करणं आवश्यक असतं. देश संकटातून काढायचा असेल तर त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो, मी म्हणून सांगतो आत्ता जो निर्णय घेतलाय तो विधानसभेला पण लागू आहे असं अजिबात नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.