कल्याण-शीळ फाट्यावर 6-6 तास कोंडी, दोन दिवसात ट्रॅफिक सुरळीत करा, मनसेचा अल्टिमेटम
वाहतूक दोन दिवसात सुरळीत झाली नाही, तर रस्त्याचे काम बंद पाडणार असा इशारा आमदार राजू पाटील यांनी वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना दिला आहे.
कल्याण : कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत (Raju Patil Slams Traffic Police). दररोज सहा तास वाहतूक कोंडीत नागरिक अडकून पडतात. या रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम सध्या सुरु आहे. कंत्रटदाराकडून वेडेवाकडेपणाने काम सुरु आहे. त्याचा सगळ्यात जास्त त्रास नागरिकांना होत आहे. याचा जाब विचारण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील हे आज सायंकाळी स्वत: रस्त्यावर उतरले (Raju Patil Slams Traffic Police).
त्यांनी वाहतूक पोलिसांना वाहतूक कोंडी प्रकरणी चांगलेच फैलावर घेतले. रस्त्याची वाहतूक दोन दिवसात सुरळीत झाली नाही, तर रस्त्याचे काम बंद पाडणार असा इशारा आमदार राजू पाटील यांनी वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना दिला आहे.
#कल्याण_शीळ_रस्त्यावर कित्येक लोक ३/४ तासांपासून अडकले आहेत, वाहतूक नियंत्रण शून्य आहे.@ThaneCityPolice @ThaneTraffic
— Raju Patil (@rajupatilmanase) October 21, 2020
आमदार राजू पाटील आणि प्रदेश सचिव व डोंबिवलीचे शहराध्यक्ष राजेश कदम हे आज संध्याकाळी शीळफाटा येथील नाशिक विभागाच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी ट्राफिक पोलीस अधिकाऱ्याला चांगलंच फैलावर घेतले. वाहतूक कोंडी का होत आहे?, यासाठी काय तोडगा काढला गेला आहे? अवजड वाहनं का थांबवले गेले नाहीत?, कंत्राटदार बेशिस्तपणे काम करतोय याकडे कोण लक्ष देणार, असे अनेक प्रश्न पोलीस अधिकाऱ्यासमोर मांडले. तसेच, या वाहतू कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत, वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो, असंही ते म्हणाले.
सहा ते आठ तास लोक वाहतूक कोंडीत अडकून पडतात. यापूर्वी रस्त्यावर उतरुन वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. आता पुन्हा रस्त्याचे सहा पदरीकरण सुरु आहे. कंत्रटदाराकडून सेफ्टी नॉर्म्स पाळले जात नाहीत. कामाच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावलेले नाही. पोलिसांकडून या रस्त्यावर अवजड वाहने सोडली जातात. अवजड वाहने सोडण्याची वेळ रात्री दहा ते सकाळी सात अशी आहे, असंही राजू पाटील यांनी सांगितलं (Raju Patil Slams Traffic Police).
नवी मुंबई आणि कल्याणच्या दिशेने रस्त्यावर अवजड वाहने सोडली जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यात कंत्रटदाराचे काम वेडेवाकडे सुरु आहे. या प्रकरणी राजू पाटील यांनी जाब विचारत वाहतूक पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले. आमदारांना वाहतूक कोंडीत मार्ग काढण्यासाठी दोन तासापेक्षा जास्त वेळ लागला. त्यामुळे सामान्य नागरिकांची वाहतूक कोंडीत काय हालत होत असेल याकडे आमदारांनी लक्ष वेधले आहे.
“वाहतूक कोंडी होत असल्याने वॉर्डन वाढवून मागितले होते. ही मागणी वारंवार केली गेली आहे . त्याचबरोबर कोरोनामुळे नोटिफिकेशन रखडले होते. ते उद्यार्पंयत काढण्यात येईल”, अशी माहिती यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश लाभभाते यांनी दिली (Raju Patil Slams Traffic Police).
संबंधित बातम्या :
पत्रीपुलाला हेरिटेजचा दर्जा द्या, मनसे आमदार राजू पाटलांची उपरोधिक मागणी