‘बत्ती गुल’ होण्यामागे घातपाताची शक्यता- ऊर्जामंत्री, तर जबाबदारी कशी टाळाल? राम कदमांचा सवाल

मुंबई: मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता खुद्द उर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केल्यानंतर मोठी खळबळ माजली आहे. मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असं ट्विट नितीन राऊत यांनी केलंय. राऊतांच्या या ट्विटला आता भाजपनंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. घातपाताची शक्यता म्हणून राज्य सरकारला जबाबदारी कशी टाळता येईल? असा सवाल […]

'बत्ती गुल' होण्यामागे घातपाताची शक्यता- ऊर्जामंत्री, तर जबाबदारी कशी टाळाल? राम कदमांचा सवाल
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 11:12 AM

मुंबई: मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता खुद्द उर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केल्यानंतर मोठी खळबळ माजली आहे. मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असं ट्विट नितीन राऊत यांनी केलंय. राऊतांच्या या ट्विटला आता भाजपनंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. घातपाताची शक्यता म्हणून राज्य सरकारला जबाबदारी कशी टाळता येईल? असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी विचारलाय. (BJP MLA Ram Kadam questioning to Nitin Raut)

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता व्यक्त केल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीय. भाजप आमदार राम कदम यांनी ऊर्जामंत्र्यांना प्रश्न विचारताना सरकार आपली जबाबदारी कशी झटकू शकतं? असा सवाल केलाय. त्याचबरोबर ‘कोट्यवधी लोकांची गैरसोय झाली, त्यांना त्रास झाला, संपत्तीपासून सर्वच गोष्टींचं नुकसान झालं. याला जबाबदार तुमच्या सरकारचा नाकर्तेपणा आहे, त्यामुळं उगाच अशी वक्तवंय करुन तुम्हाला लोकांची दिशाभूल करता येणार नाही,’ असं प्रत्युत्तर कदम यांनी दिलंय.

सोमवारी नेमकं काय घडलं?

सोमवारी मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईच्या काही भागातील वीज पुरवठा तब्बल तीन तास खंडित झाला होता. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. लोकल वाहतूक, कार्यालयीन कामकाज, रुग्णालयातील यंत्रणा, कोविड सेंटर आणि दैनंदिन कामांवर त्याचा मोठा परिणाम झाला होता. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत जवळपास तीन तास वीज नव्हती. त्यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीची बैठक बोलावली होती. यानंतर तांत्रिक बिघाडाची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होते.  या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशीही चर्चा केली. भविष्यात पुन्हा अशी घटना होऊ नये यासाठी सर्वतोपरी उयापयोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा खात्याला दिले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील वीज जाण्यामागील तांत्रिक दोष आणि जबाबदार व्यक्ती शोधण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

गेल्या दशकभरात मुंबईत इतक्या दीर्घकाळ वीज पुरवठा खंडित होण्याची ही चौथी वेळ होती. आगामी काळात असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी आता सरकारी पातळीवर हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. त्यासाठी कोणत्सुया धारणा करण्याची गरज आहे, याबाबतच्या सर्पव र्यायांवर आता नव्याने चर्चा सुरु झाली आहे.

संबंधित बातम्या: 

मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता- नितीन राऊत

Mumbai Power Cut : मुंबईतील लालबाग, परळ भागात गेलेली वीज तासाभरानं परतली; अखेर नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

मुंबईचा वीज पुरवठा खंडित का झाला? तातडीने चौकशी करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

BJP MLA Ram Kadam questioning to Nitin Raut

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.