दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये : रामदास आठवले

रामदास आठवले यांनी हाथरस प्रकरणावरुन संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये : रामदास आठवले
Follow us
| Updated on: Oct 05, 2020 | 7:53 PM

मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी हाथरस अत्याचार प्रकरणावरुन रिपब्लिकन पक्षाचे (RPI) अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंवर सडकून टीका केली. त्यानंतर आता रामदास आठवले यांनी देखील संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे (Ramdas Athawale criticize Sanjay Raut on Hathras rape case ). “संजय राऊत यांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचाराविरुद्ध ब्र शब्द काढला नाही. ते दलित अत्याचारविरुद्ध कधीही पुढे आले नाहीत,” असा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे.

जिथं जिथं दलित अत्याचार होईल तेथे मी पोहोचलेलो आहे. दलित अत्याचराविरुद्ध सतत लढत राहिलो आहे. दलित पँथरच्या चळवळीतून मी पुढे आलो आहे. त्यामुळे दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचं शिकवू नये, असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी रामदास आठवलेंवर टीका करताना हाथरस प्रकरण घडत असताना आठवले नटींच्या घोळक्यात होते, असा आरोप केला होता. रामदास आठवले यांनी त्यालाही उत्तर दिलं. रामदास आठवले म्हणाले, “संजय राऊत हे नटींच्या घोळक्यात असतात की नाही ते माहीत नाही. मात्र मी नटींच्या घोळक्यात नसतो, तर नेहमीच कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतो. दलित अत्याचाराविरुद्ध मीच मूळ पँथर आहे. हाथरसची घटना घडली त्यादिवशी मुंबईत राज्यपालांची पूर्वनियोजित भेट ठरली होती. ती भेट झाल्यानंतर आम्हाला हाथरसच्या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर लगेचच त्या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध केला, आंदोलन केले.”

“हाथरस प्रकरणी मी लखनौला जाऊन उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनाही भेटलो. हाथरसला भेट देण्यास तेथील जिल्हा प्रशासनाने सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेट देण्यापासून अडवलं होतं. त्यामुळे मी 2 ऑक्टोबरला हाथरसला जाऊ शकलो नाही. आता मात्र मी उद्याच हाथरसला जाऊन पीडित दलित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. त्यांना संरक्षण मिळवून देणार आहे,” असंही रामदास आठवले यांनी सांगितलं.

“संजय राऊत सामनामधूनही दलित अत्याचाराच्या प्रश्नावर कधी व्यक्त झाले नाहीत”

रामदास आठवले म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलावंतांची कदर करणारे नेते होते. त्यांचे अनेक चित्रपट कलाकारांशी चांगले संबंध होते. त्यामुळे एखाद्या अभिनेत्री महिलेवर अतिप्रसंगचा एव्हढा अन्याय झाला असताना त्या महिलेची बाजू संजय राऊत यांनी घेतली नाही. कलाकार अभिनेत्री यांना महिला म्हणून सन्मान न देता त्यांना जाहीर अपशब्द वापरले. त्यातून कलाकारांचा सन्मान करण्याची बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला संजय राऊत यांनी हरताळ फासण्याचे काम केले.”

“कंगना राणावत प्रकरणात आम्ही कधीही संजय राऊत यांच्यावर टीका केली नाही. ते आमच्यावर टीका करीत असले तरी त्यातून मी त्यांच्यावर नाराज नाही. ते माझे मित्र आहेत. पायल घोष ही अभिनेत्री तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत भूमिका मांडते. ती अभिनेत्री असली तरी महिला आहे. त्यातून आम्ही तिची बाजू घेतली. संजय राऊत यांनी तिची बाजू घेतली का? जिथे जिथे महिलांवर दलितांवर अत्याचार होतात तिथे तिथे आम्ही त्या त्या महिलेची बाजू घेत आलो आहोत. दलितांच्या प्रश्नांवर आम्ही सतत लढत आलो आहोत, पण संजय राऊत हे सामना मधूनही दलित अत्याचाराच्या प्रश्नावर व्यक्त झाले नाहीत. त्यांनी संसदेतही खासदार म्हणून दलित अत्याचार प्रश्नांवर आवाज उठवला नाही,” असंही आठवले म्हणाले.

“दलितांच्या प्रश्नांवर दलित लढत असतात दलितांच्या प्रश्नांसाठी सवर्ण पुढाऱ्यांनी कधी लढा उभारला आहे का? दलितांचे मतदान हवे आहे, पण दलितांवरील अत्याचाराचा साधा निषेध तरी यापूर्वी कधी संजय राऊत आणि त्यांच्या पक्षनेत्यांनी केला आहे का?,” असा सवालही रामदास आठवले यांनी केला.

योगी आदित्यनाथ यांचा रामदास आठवले यांना फोन, आठवले हाथरसला भेट देणार

दरम्यान, देशभरातून हाथरस अत्याचार प्रकरणाविरोधात असंतोष पाहायला मिळत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (5 ऑक्टोबर) रामदास आठवले यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. हाथरसमधील दलित मुलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश सरकार आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करेल, असं आश्वासन आदित्यनाथ यांनी आठवले यांना दिलं.

योगी आदित्यनाथ रामदास आठवलेंना म्हणाले, “हाथरस प्रकरणात पीडित दलित युवतीच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देऊन तिला न्याय मिळवून देऊ. तिच्या कुटुंबियांना शहरात चांगले घर दिले जाईल. कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देखील देणार आहे. तसेच 25 लाख रुपये सांत्वनपर निधी देण्यात येणार आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करणार आहे. तसेच या प्रकरणी कारवाई करण्यात कर्तव्यात कसूर करणारे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांचही निलंबन करण्यात आलं आहे.”

दरम्यान रामदास आठवले मंगळवारी (6 ऑक्टोबर) हाथरस प्रकरणातील पीडित दलित युवतीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. तसेच पीडित मुलीच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळवून देण्याची मागणी देखील आठवले करणार आहेत.

हेही वाचा  :

प्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, चित्रा वाघ यांची योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी

Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या तपासादरम्यान छाती बडवणारे आता कुठे? अनिल परबांचा आठवले-कंगनावर निशाणा

एका नटीसाठी एक कायदा, बेटीच्या देहाची मात्र विटंबना : संजय राऊत

Ramdas Athawale criticize Sanjay Raut on Hathras rape case

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.