चाकूच्या धाकावर मुंबईत विवाहितेवर बलात्कार, अश्लील व्हिडिओ बनवून मित्रांमध्ये व्हायरल

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यावेळी आरोपी फय्याजने महिलेचा व्हिडिओ तयार केला आणि तो मित्र सादिक पटेलच्या मोबाइलवर पाठवला.

चाकूच्या धाकावर मुंबईत विवाहितेवर बलात्कार, अश्लील व्हिडिओ बनवून मित्रांमध्ये व्हायरल
Follow us
| Updated on: Oct 02, 2020 | 1:27 PM

मुंबई : उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथल्या बलात्काराच्या घटनेनं देश हादरला असताना राज्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी दोन आरोपींना अटकही केली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. (Rape on married woman in Mumbai accused viral pornographic video)

दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय पीडित महिलेची ओळख शेजारी राहणाऱ्या फय्याज शेखसोबत झाली होती. जून 2018 मध्ये फय्याजने महिलेला घरी बोलवलं होतं आणि चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यावेळी आरोपी फय्याजने महिलेचा व्हिडिओ तयार केला आणि तो मित्र सादिक पटेलच्या मोबाईलवर शेअर केला.

यानंतर सादिक पटेल यानेही महिलेला व्हिडिओ दाखवून धमकी देत तिला ब्लॅकमेल केलं आणि बलात्कार केला. त्यानंतर दोघांनीही त्यांचा तिसरा मित्र नदीमला व्हिडिओ पाठवला आणि त्यानेही पीडित महिलेला ब्लॅकमेल करणं सुरू केलं. अखेर पीडित महिलेनं महत्त्वाची भूमिका घेत दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या सांगण्यावरून कलम 376 (2) एन, 354, 345 डी, 506 (2) आयटी अ‍ॅक्टसहित 66 ई अंतर्गत गुन्हा दाखल केला. (Rape on married woman in Mumbai accused viral pornographic videos Hathras incident)

मिळालेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर रोजी दिंडोशी पोलिसांनी फय्याज शेख आणि सादिक पटेल या दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांचा मित्र नदीम अद्याप फरार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरनेंद्र कांबळे यांनी दिली आहे. दरम्यान, नवी मुंबईतूनही बलात्काराचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नवी मुंबई शहरात एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका 25 वर्षीय इसमाला अटक करण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या पत्नीवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा त्याची पत्नी आणि सहा वर्षाच्या मुलासह नेरुळ गावात राहत असून पीडित मुलगी त्याच्या घराशेजारी राहत होती.

(Rape on married woman in Mumbai accused viral pornographic videos Hathras incident)

संबंधित बातम्या –

नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर

हाथरसच्या मुलीवर बलात्कार झालाच नाही, यूपीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांचा दावा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.