Remdesivir Medicine | रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार, 3 हजाराचे इंजेक्शन 25 हजारांना, पाच जणांना अटक
3 हजाराचे इंजेक्शन 25 हजार रुपयांना तर अन्य एक इंजेक्शन तब्बल 80 हजार रुपये किमतीत ही टोळी विकत होती
ठाणे : कोरोनावर प्रभावी मानले जाणारे रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार (Remdesivir Injection Black Market Racket) करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. 3 हजाराचे इंजेक्शन 25 हजार रुपयांना तर अन्य एक इंजेक्शन तब्बल 80 हजार रुपये किमतीत ही टोळी विकत होती (Remdesivir Injection Black Market Racket).
देशात आणि महाराष्ट्रात कोव्हिड-19 चा वाढता प्रादुर्भाव आणि मृत पावलेल्या लोकांची संख्या यामुळे कोव्हिडवर परिणामकारक ठरलेल्या Remdesivir आणि Tocilizumab ही दोन इंजेक्शन रक्षक ठरलेली आहेत. मात्र, त्याचा बाजारात तुटवडा आहे. दरम्यान, या इंजेक्शनचा काळाबाजार करुन 25 हजार आणि 80 हजार रुपयांचे इंजेक्शन विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक करुन रॅकेट उध्वस्त केले. त्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात जीवांरक्षक औषधांचा काळाबाजार, अतिरिक्त पैसे घेणे प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे न्यायालयाने 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक अधिक तपास करत आहेत.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
सध्या कोरोनावर परिणामकारक असलेली औषधं बाजारात कमी आहेत. त्यामुळे तुटवडा जाणवणाऱ्या Remdesivir आणि Tocilizumab ही दोन इंजेक्शनच्या मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे उकळण्याचा धंदा सध्या तेजीत आहे.
तक्रारदारानुसार, 21 जुलै 2020 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास ठाणे खंडणी विरोधी पथकाला वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची खातरजमा करीत संभावित तीन पेट्रोल पंप, नौपाडा भागात सापळा रचला. पोलीस पथकाने जीवांरक्षक इंजेक्शनसह तिघांना अटक केली. त्यांच्या अधिक चौकशीत औषधे पुरविणारे दोन आरोपी हे नवी मुंबई कामोठे येथे असल्याचे समजताच त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले (Remdesivir Injection Black Market Racket).
अरुण रामजी सिंग, सुधाकर शोभीत गिरी, रविंद्र मोहन शिंदे, वसीम अहमद अब्दुल अहमद शेख, अमिताब निर्मल दास असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून Remdesivir आणि Tocilizumab ही दोन इंजेक्शनसह कँसर, गर्भपात आदींची औषधं आणि हुंडाई एसेंट कार असा 5 लाख 18 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. ही टोळी Remdesivir आणि Tocilizumab ही दोन इंजेक्शनचा काळ्याबाजारात 25 हजार आणि 80 हजार रुपये घेत होते.
तर दुसरीकडे, आतापर्यंत मीरा रोड, मुलुंड आणि ठाण्यात अशा प्रकारे 3 कारवाई अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे काळा बाजार करुन इंजेक्शन विकणाऱ्या विरोधात नागरिकांनी देखील समोर यावे, असे आव्हान अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केले आहे. तसेच, यामागे बड्या रुग्णालय आणि मेडिकलशी निगडित कोणाचा हात आहे का, याचा देखील तपस करीत असल्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सांगितले आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
अशाप्रकारे काळा बाजार करणाऱ्या टोळीचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला असून याबाबत कोव्हिड रुग्णांसाठी लागणारे औषध आणि इंजेक्शनबाबत विचारपूस केली असता चढ्या भावाने विकणाऱ्या टोळीशी संपर्क करुन त्यांच्याबाबत ठाणे पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत छडा लावण्याचे काम तक्रारदार बनून वर्गीस यांच्या मार्फत पुढे आले आहे. मागे देखील मीरा रोड येथे अशाच प्रकारे टोळीचा पर्दा फाश करण्याचे काम वर्गीस यांनी केले आहे.
Corona Vaccine | ऑक्सफर्डची कोरोना प्रतिबंधात्मक लस डिसेंबरमध्ये बाजारात, सिरम इन्स्टिट्यूटचा दावा https://t.co/GVOek2l9Zu #coronavirus #coronavaccine
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 22, 2020
Remdesivir Injection Black Market Racket
संबंधित बातम्या :
Maharashtra Corona Update | दिवसभरात 10,576 नवे कोरोना रुग्ण, गेल्या 15 दिवसातील सर्वात मोठा आकडा
Pune | बेड न मिळाल्याने ठिय्या देणाऱ्या पुण्यातील रुग्णाचा मृत्यू, महापौरांचा कारवाईचा इशारा