आदित्य ठाकरेंची स्वप्नपूर्ती, मुंबईत ‘नाईट लाईफ’चा प्रयोग रंगणार
येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु करण्याला परवानगी देण्यात आली (aditya thackeray Nightlife in mumbai) आहे.
मुंबई : येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु करण्याला परवानगी देण्यात आली (aditya thackeray Nightlife in mumbai) आहे. नुकतंच याबाबत एक बैठक पार पडली. या बैठकीत प्रायोगित तत्त्वावर नाईट लाईफ सुरु करण्याला संमती देण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईमध्ये बीकेसी, नरिमन पॉईंट, कालाघोडा या ठिकाणचे हॉटेल, पब, मॉल्स, थिएटर 24 तास खुले राहणार आहे. हे सर्व सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येत आहे.
आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मॉल्स आणि मिलमधील हॉटेल्स, पब, बार 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार मध्यरात्री दीडपर्यंत बार सुरु ठेवण्याचा परवाना दिला आहे. अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
परिपत्रक प्रसिद्ध नाही
आदित्य ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या हॉटेल्स व्यवस्थापन आणि मॉल व्यवस्थापनसोबत बैठक घेतली. त्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर आजपासूनच मॉलमधील खाद्यपदार्थांची दुकानं सुरू ठेवण्यास हरकत नाही. अशी माहिती हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी दिली. दरम्यान याबाबत अंतिम नियमावली आणि परिपत्रक अद्याप प्रसिद्ध झालेला नाही.
आदित्य ठाकरेंची संकल्पना
मुंबईत नाईटलाईफ असावं ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. भाजप शिवसेना युती सरकारच्या वेळी आदित्य ठाकरेंनी ही संकल्पना मांडली होती. त्यावेळी याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र आता महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर प्रायोगिक तत्वावर यावर निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे आदित्य ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने हे पहिले पाऊल पडलं आहे. या निर्णयानंतर आता मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स 24 तास सुरु राहू शकतात. ज्यांची इच्छा असेल ते 24 तास व्यवसाय करु (aditya thackeray Nightlife in mumbai) शकतात.
मुंबईत हाँटेल, बार, पब 24×7 सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजले. त्याबाबत नियम, नियमावली काय आहे ही प्रसिद्ध व्हायची आहे. ती झाल्यावर सविस्तर बोलूच. पण निवासी भागात हाँटेल,पब 24×7 सुरु ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर आमचा कडाडून विरोध राहिल!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 17, 2020
भाजपचा विरोध
मुंबईतील हॉटेल्स, बार, पब 24 तास सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजले. त्याबाबत नियम, नियमावली अद्याप प्रसिद्धी व्हायची आहे. ती झाल्यावरसविस्तर बोलूच. पण निवासी भागात हॉटेल्स, पब चोवीस तास सुरु ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर आमचा कडाडून विरोध राहीलं, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.
“महाराष्ट्राला नेहमीच दुजाभाव मिळतो. जर अहमदाबादमध्ये नाईट लाईफ सुरु आहे. तर मुंबईत का नाही,” असे प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी शेलारांना (aditya thackeray Nightlife in mumbai) दिले.