चर्चा शिवसेनेनं थांबवली, आता त्यांची काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा सुरू: माधव भांडारी
भाजप-शिवसेनेची सत्तावाटपावरुन (BJP Shivsena Government Formation Dispute) रस्सीखेच सुरूच आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील 50-50 च्या वाट्यावर अडून बसली आहे.
मुंबई: भाजप-शिवसेनेची सत्तावाटपावरुन (BJP Shivsena Government Formation Dispute) रस्सीखेच सुरूच आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील 50-50 च्या वाट्यावर अडून बसली आहे. तर दुसरीकडे भाजपही आमदारांच्या संख्येनुसार सत्तेची विभागणी करण्यावर भर देत आहे. आता भाजपचे नेते माधव भांडारी यांनी एक नवा खुलासा केला आहे. सत्तास्थापनेची (BJP Shivsena Government Formation Dispute) चर्चा भाजपनं नाही, तर शिवसेनेनं थांबवल्याचं सांगत शिवसेना सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा करत असल्याचं माधव भांडारी यांनी म्हटलं आहे.
माधव भांडारी म्हणाले, “कोण काय बोलतंय याला काही अर्थ नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे आम्ही चर्चा थांबवलेली नाही, तर शिवसेनेनेच थांबवली आहे. कारण आता ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करत असल्याची माहिती आहे. आम्ही महायुतीच्या नावानं मत मागितली आहेत. त्यामुळे आम्ही शिवसेनेसोबतच जाणार आहोत. शपथविधी लवकरच पार पडेल.”
विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपला शिवसेनेच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करणं शक्यच नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिवसेनेची “बार्गेनिंग पावर” वाढली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून थेट मुख्यमंत्री पदालाच लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्रीपद नाही, पण महत्त्वाची खाती तरी पदरात पाडून घेण्यात शिवसेना यशस्वी होताना दिसत आहे. यात शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अस्पष्ट भूमिकेचाही चांगलाच फायदा झाल्याचं बोललं जात आहे.
संबंधित बातम्या
संजय राऊतांना शिवसेनेकडून अधिकृतपणे बोलण्याचा अधिकार नाही : प्रसाद लाड
… तर राज्यात राष्ट्रपती राजवटीची वेळ येईल : सुधीर मुनगंटीवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, शिवसेनेच्या बालेकिल्यात भाजपचे पोस्टर्स!
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, काँग्रेसचं शिष्टमंडळ सोनिया गांधींच्या भेटीला