मुख्यमंत्र्यांमध्ये श्रीकृष्णाची चतुरता : मंगल प्रभात लोढा

मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती झालेले मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.

मुख्यमंत्र्यांमध्ये श्रीकृष्णाची चतुरता : मंगल प्रभात लोढा
Follow us
| Updated on: Jul 19, 2019 | 5:31 PM

मुंबई : मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती झालेले मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. यावेळी मंगल प्रभात लोढा म्हणाले, “पक्षाची परंपरा असते, झाडं कोणी लावतो तर फळं दुसरा चाखतो. तसंच आज जी गर्दी झाली आहे ती माझ्यामुळे नाही तर मावळते अध्यक्ष आशिष शेलार यांच्यामुळेच”

याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व फक्त राजकीय नाही तर कामाचे नेतृत्व आहे. मला गर्व आहे देवेंद्र यांच्यात भगवान श्रीकृष्णाची चतुरता आहे, अशी उपाधीही लोढांनी दिली. तसंच विधानसभा निवडणुकीत मुंबईतील सर्व 36 जागा जिंकण्यासाठी अथक परिश्रम घेण्याची तयारी लोढा यांनी दर्शवली. मुंबईत 36-0 असा विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मतदान यादीत नाव असेल तर पूर्ण भारतीय म्हणून काम करा, असा सल्ला लोढा यांनी कार्यकर्त्यांना दिला.

2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत 48 तास आधी युती तुटली. तेव्हा आपल्या 15 जागा आल्या. आता युती झाली आहे. मुंबईत 36 -0 अशी मॅच जिंकायची आहे, असं लोढा म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून आशिष शेलारांना शाबासकी

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळते मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचं कौतुक केलं.

“मागील 6 वर्षे आशिष शेलार यांनी मुंबई भाजपला अतिशय चांगलं नेतृत्व दिलं. मुंबई भाजप लोकाभिमुख केली. यशस्वी नेतृत्व मुंबई भाजपला दिलं.विधानसभा, महापालिका निवडणुकीत कार्यकत्यांची मोठी फळी उभी राहिली. विधानसभा आणि महापालिकेत मुंबईत क्रमांक 1 वर पोहोचलो” असं मुख्यमंत्री म्हणाले.

आशिषजी मंत्री आणि मंगलजी मुंबई अध्यक्ष पदी नियुक्त झाले. मंगलजी हे समाजमन जाणणारे प्रभावी नेते आहेत. ते हाडाचे कार्यकर्ते आहेत. कुठलंही काम ते स्वतःला झोकून देऊन करतात. जे काम दिले ते नीट करायचे हा मंगलजी यांचा स्वभाव आहे. KDMC निवडणुकीत त्यांनी ठाम भूमिका मांडली की ती निवडणूक आपण वेगळी लढली पाहिजे. त्यांनी जबाबदारी घेतली. त्यांनी आत्मविश्वास उभा केला. ताकद दिसली 8 वरून 42 नगरसेवक निवडून आले, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मंगल प्रभात लोढा यांची बॅक ऑफिसप्रमाणे सायलेंटपणे कामं करायची ही खासियत आहे.  आपल्या सरकारने घेतलेले निर्णय, मुंबईतील सर्वसामान्य माणसाला घर मिळेल. आपण जी नीती तयार केली, बिल्डिंग रिडेव्हलपेंट कायदा तयार करीत आहोत. बिल्डिंग कोसळून जी भीषणता पाहायला मिळते,ती मिळू नये, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचंड समर्थन मिळाले आहे. मोदींवर सर्वाधिक प्रेम मुंबईचे आहे. मुंबईच्या प्रेमाला तशाच प्रकारच्या कामाने उत्तर द्यायचे आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.