Corona : कल्याणमध्ये सहा महिन्यांच्या बाळाची कोरोनावर मात, नागरिकांकडून टाळ्या,थाळ्या वाजवत जंगी स्वागत

कल्याण पश्चिम येथील एका 6 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता ते बाळ बरे होऊन आपल्या घरी आले आहे.

Corona : कल्याणमध्ये सहा महिन्यांच्या बाळाची कोरोनावर मात, नागरिकांकडून टाळ्या,थाळ्या वाजवत जंगी स्वागत
Follow us
| Updated on: Apr 12, 2020 | 10:13 AM

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये (Corona Virus) सतत वाढ होत आहे. मात्र, या (Baby Defeat Corona Virus) चिंता वाढवणाऱ्या वातावरणात एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. कल्याण पश्चिम येथील एका 6 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता ते बाळ बरे होऊन आपल्या घरी (Baby Defeat Corona Virus) आले आहे.

आज जिथे संपूर्ण देश या कोरोनाच्या विळख्यात आहे. तिथे एका सहा महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केली आहे. कोरोनाला हरवून जेव्हा हे बाळ परत आपल्या घरी आलं तेव्हा शेजाऱ्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं. टाळ्या,थाळ्या आणि शिट्या वाजवत आसपासच्या सोयायटीमधील नागरिकांनी त्या बाळाचं स्वागत केलं.

याप्रसंगी बाळाची आई अत्यंत खुश होती. तिने बाळाचा हात वर करत सर्वाचे आभार मानले. यावेळी पोलीस, डॉक्टर आणि रुग्णावाहिका चालक यांच्यासाठीही नागरिकांनी टाळ्या वाजवल्या.

यावेळी मनसे नगरसेविका कस्तुरी देसाई या देखील तिथे उपस्थित होत्या. बाळाची काळजी घेतली जाईल आणि तपासणीसाठी डॉक्टर सुद्धा वेळोवेळी पाठवले जातील, असे कस्तुरी देसाई यांनी सांगितलं (Baby Defeat Corona Virus).

पाहा व्हिडीओ :

कल्याणमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 35 वर

कल्याणमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या कल्याणमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 35 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतेच

राज्यात काल (11 एप्रिल) कोरोनाच्या 187 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1761 झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra). आतापर्यंत 208 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांना घरीही सोडण्यात आले आहे. तर 127 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.

Baby Defeat Corona Virus

कोरोनाचे राज्यात कुठे किती रुग्ण? पाहा संपूर्ण यादी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

Corona : मालेगावात पाच नवे कोरोना रुग्ण, दहा वर्षाखालील दोन मुलांना कोरोना

चंद्रपुरात तेराव्याच्या जेवणाचे निमंत्रण, 40 लोकांना विषबाधा, पोलीस पाटलाकडून लॉकडाऊनचे उल्लंघन

राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1761 वर, कोणत्या ठिकाणी किती रुग्ण?

Lockdown : लॉकडाऊन पक्ष्यांच्या जीवावर, अन्न पाण्यावाचून 25 ते 30 कावळ्यांचा मृत्यू

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.