एसटीचा मोठा निर्णय, जवळपास दहा हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित

एसटी महामंडळाने जवळपास 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीने हा निर्णय घेतला. ST suspends many workers service

एसटीचा मोठा निर्णय, जवळपास दहा हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित
Follow us
| Updated on: Jul 17, 2020 | 6:54 PM

मुंबई : कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी अशा परिस्थितीत कोणाला नोकरीवरुन काढू नका असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. मात्र एसटी महामंडळाने जवळपास 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीने हा निर्णय घेतला. (ST suspends many workers service)

एसटी बंद असल्याने उत्पन्न रखडलं, त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कोरोना संकट टळल्यानंतर पुढील परिस्थिती पाहून या कर्मचाऱ्यांना पुन्हा ज्येष्ठतेनुसार सेवेत घेतलं जाणार आहे.

सरकार एकीकडे नोकरीवरुन काढू नका म्हणत असताना एसटीतून 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. 2019 च्या भरतीमधली ही सेवा स्थगित करण्यात आली आहे.

जवळपास 8500 वाहक, चालकांसह इतर कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित करण्यात आली आहे. ज्यांचं प्रशिक्षण सुरु आहे, त्या कर्मचाऱ्यांचंही प्रशिक्षण थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचं पत्रक विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आलं आहे.

एसटीच्या पत्रकात काय म्हटलं आहे?

  • सरळसेवा 2019 मध्ये भरती झालेले चालक-वाहक यांची सेवा तात्पुरती खंडित करावी.
  • भविष्यात गरज असेल तर ज्येष्ठतेनुसार पुन्हा सेवेत घ्यावे
  • चालक-वाहक, सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, अन्य अधिकारी किंवा अनुकंपा तत्वावरील जे उमेदवार प्रशिक्षण घेत असतील, ते सुद्धा थांबवावे

(ST suspends many workers service)

संबंधित बातम्या  

Corona Care | एसटी बसमध्ये आता आसनव्यवस्थेचा ऑड-इव्हन फॉर्म्युला

Ratnagiri Corona | सोशल डिस्टन्सिंग पाळत रत्नागिरीत एसटी बससेवा सुरु

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....